breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात हिंजवडी परिसरात ओयो हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह आढळला. या महिलेची मध्यरात्री गोळ्या झाडून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समजते. हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी महिलेच्या हत्येप्रकरणी एकाला ताब्यातही घेतलं आहे. घटनेमागे प्रेम प्रकरणाचं कारण असल्याचा संशय पोलिसांना आहे.

पिंपरी चिंचवड शहरात एका ओयो हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. महिलेची मध्यरात्री हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास केला जात आहे.

हेही वाचा – ‘ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना, सरकारकडून हट्ट पुरवण्याचं काम सुरु’; छगन भुजबळांची नाराजी

साँफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीची ओयो हाँटेलमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. लखनऊवरुन आलेल्या ऋषभ निगम याने तिची हत्या केली. यानंतर तो पळून मुंबईला जाण्याच्या प्रयत्नात होता. पण  मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी करत अटक केली. गुन्ह्यासाठी वापरले गेलेले पिस्टल देखील जप्त करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button