मोशी-आदर्शनगरमध्ये वीजवाहिन्या होणार भूमिगत!
आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार स्थानिक रहिवाशांना मिळाला दिलासा
![Electricity lines will be underground in Moshi-Adarshnagar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Mahesh-Langde-Bhosri-780x470.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
मोशी आदर्शनगर येथील वीजवाहिन्या धोकादायकपणे उघड्यावर न ठेवता भूमिगत करण्याच्या कामाला गती मिळाली आहे. भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने हे काम हाती घेण्यात आले असून, स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
माजी महापौर नितीन काळजे यांच्यासह चंद्रकांत तापकीर, सचिन तापकीर, राजू सस्ते, वंदना आल्हाट आणि महावितरणचे अधिकारी रमेश सूळ यांच्या उपस्थितीत मिनी फिडरच्या पीलरचे भूमिपूजन करण्यात आले.
वास्तविक, आदर्शनगर येथील मोर्य कॉलनी येथील स्थानिक नागरिकांना धोकादायकपणे वीजपुरवठा घ्यावा लागत होता. त्यामुळे या वीजवाहिन्या भूमिगत करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. याबाबत ‘परिवर्तन हेल्पलाईन’ वर तक्रार प्राप्त झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून कामाला गती देण्यात आली, अशी माहिती ‘परिवर्तन’चे समन्वयक ऋषभ खरात यांनी दिली.
महावितरणच्या मोशी शाखेअंतर्गत ‘डीपीडीसी’योजने अंतर्गत केबल व मिनी फिडर पिलर टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना घरांवरुन किंवा उघड्यावरुन वीज कनेक्शन घेण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सुमारे ७०० रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
उघड्यावरुन वीज वाहिन्या टाकल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. आमदार लांडगे यांनी सकारात्मक पुढाकार घेवून वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम मार्गी लावले. त्यामुळे लहान मुले, नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
नसुरुद्दीन शेख, स्थानिक रहिवाशी
तीन-चार वर्षांपासून भूमिगत वीजवाहिन्यांसाठी आम्ही मागणी करीत होतो. मात्र, यश मिळत नव्हते.त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांसाठी धोका निर्माण होत होता. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी मदत केली. त्याबद्दल धन्यवाद देतो.
दिनेश धोका, स्थानिक रहिवाशी
तीन-चार वर्षांपासून भूमिगत वीजवाहिन्यांसाठी आम्ही मागणी करीत होतो. मात्र, यश मिळत नव्हते.त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांसाठी धोका निर्माण होत होता. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी मदत केली. त्याबद्दल धन्यवाद देतो.
कराळे- पाटील, स्थानिक रहिवाशी.