breaking-newsपिंपरी / चिंचवड

भाजपा सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षपदी विजय भिसे यांची निवड

पिंपरी : पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील कला, संगीत, साहित्य सांस्कृतिक चळवळीत सदैव सक्रिय असलेले विजय भिसे यांची भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

१९८३ ते १९८५ मध्ये त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी पुणे शाखा येथे पूर्णवेळ काम केले आहे. पिंपळे सौदागर येथील भूमिपुत्र असलेले विजय भिसे यांचा पुणे शहरात होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सदैव सहभाग राहिला आहे. पुणे शहरातील सवाई गंधर्व महोत्सव गेली ३५ वर्षे ते श्रवण करत आले आहेत. पुण्यातील आशय फिल्म क्लबचे ते आजीव सदस्य आहेत. पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशचे ते संस्थापक आहेत.

हेही वाचा – श्री सिद्धेश्वर महास्वामींच्या स्मरणार्थ गुरु नमन महोत्सवाचे भोसरीत आयोजन 

भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष सुजाता पालांडे यादेखील फौंडेशनच्या कार्यकारीणी सदस्य आहेत. फौंडेशनच्या माध्यमातून त्यांनी दरवर्षी एक्कावन्न हजार रुपयांचा कलाविभूषण पुरस्कार गुणी कलाकारांसाठी सुरू केला आहे. सावनी रवींद्र यांना मानाचा पहिला पुरस्कार दिला गेला. त्यानंतर नागराज मंजुळे यांनाही हा पुरस्कार दिला गेला तसेच त्यांची जाहीर प्रकट मुलाखत देखील घेण्यात आली.

राधा मंगेशकर यांच्या गाण्यांचे कार्यक्रम आणि मुलाखतही गाजली. अनेक सांगितिक कार्यक्रमांचे त्यांनी आयोजन केले आहे. पृथ्वीराज थिएटर्स ,स्वरा म्युझिकल सारख्या संस्थांना बरोबर घेऊन त्यांनी पिंपरी चिंचवड मध्ये सांगितिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. विजय भिसे यांचे हे पैलू पाहून भाजपा चे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी त्यांनी ही नियुक्ती केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button