शिक्षण विश्व: आय. आय. बी. एम. कॉलेजमध्ये महिलांचा सन्मान
जागतिक महिला दिन : विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

पिंपरी-चिंचवड : चिखली येथील आय. आय. बी. एम. कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान म्हणजेच महिला पोलीस अधिकारी, वकील, वैद्यकीय क्षेत्र यामध्ये महत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा क्राऊन घालून त्यांना राणीचा सन्मान देण्यात आला.
सत्कारमूर्तीमध्ये चिखली पोलीस स्टेशन मधील देशमुख मॅडम, लोहकरे मॅडम आदी महिला पोलीस अधिकारी तसेच वकील सौ. प्रीती साठे, डेंटिस्ट डॉ. सुजाता पिंगळे या सर्व महिलांचा सत्कार व विद्यार्थिनींना कायदा, सुव्यवस्था, वैद्यकीय यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य प्रो. प्रदीप फुलकर, विभागप्रमुख मा.श्री. अमोल भागवत, विभागप्रमुख मा.श्री. अनिकेत वंजारी, प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ, डॉ. गरिमा मलिक, प्रो. भारती मॅडम, सर्व शिक्षक वर्ग तसेच कॉलेजच्या सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
मार्गदर्शनवेळी पोलीस अधिकारी देशमुख मॅडम यांनी सायबर गुन्हे कशा पद्धतीने घडतात व त्याला आपण बळी न पडता कसे धीटपणे सामोरे गेले पाहिजे व कोणतेही संकट असल्यास आपण व्यक्त झाले पाहिजे याचे मार्गदर्शन विद्यार्थिनींना केले. पोलीस अधिकारी लोहकरे मॅडम यांनी परिस्थिती हालाखीची असताना सुद्धा स्वतःचे व आई वडिलांचे नाव कसे गाजवावे, याबद्दल विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. वकील साठे मॅडम यांनी कायद्याविषयी विद्यार्थिनींना कोणत्या गुन्ह्याला कोणता कायदा वापरला जातो किंवा कायदा हा विद्यार्थिनींच्या बाजूने कसा असतो हे पटवून सांगितले. डॉक्टर पिंगळे मॅडम यांनी आपले करिअर घडवताना आपली स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी हवी अध्ययावत इमारत!
तसेच चेअरमन डॉ. धनंजय वर्णेकर सर उपस्थित होते प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ यांनी पापा की परी न बनता वाघाची वाघीण बनले पाहिजे असे खडसावून विद्यार्थिनींना सांगितले व कोणत्याही संकटांना न घाबरता स्वतःचे अस्तित्व निर्माण करून सर्व जग जिंकून घ्या, असा संदेश दिला. अशा पद्धतीने विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन लाभले. कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंट, एयर पोर्ट मॅनेजमेंट, क्रूझ मॅनेजमेंट असे शिक्षण दिले जात असून विद्यार्थ्यानींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे व शिक्षणानंतर विद्यार्थिनी भारतात व परदेशात सेट होतात. या अनुषंगाने विद्यार्थिनीना वेळोवेळी प्रत्येक गोष्टीचे मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. आय आय बी एम कॉलेज, कॉलेजचे प्राचार्य, विभागप्रमुख, प्रशासकीय प्रमुख, शिक्षक हे विद्यार्थिनीना सक्षम करून त्या आर्थिक दृष्ट्याही सक्षम झाल्या पाहिजेत, उच्च पदावर पोहचल्या पाहिजे, संकटांना न घाबरता परदेशात त्यांनी त्यांचं नाव गाजविले पाहिजे यासाठी नेहमी प्रयत्नशील आहे. कॉलेजच्या मार्गदर्शनाखाली आज बहुतांश विद्यार्थिनी भारतातच नाही तर परदेशातही स्वतःचे, आई वडिलांचे आणि कॉलेजचेही नाव उंचावत आहेत.
कार्यक्रमवेळी प्राचार्य आणि विभागप्रमुख यांनी सर्व महिला पोलीस वकील डॉक्टर शिक्षिका व विद्यार्थिनीना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि सर्व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते केक कटिंग होऊन महिला दिन खूप छान पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रेरणा कणावजे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. माधुरी सकुंडे यांनी केले. आय आय बी एम कॉलेज चिखली संस्थेकडून महिला पोलीस अधिकारी, डॉक्टर वकील यांचा राणीचा मान देऊन सन्मान चेअरमन डॉ. धनंजय वर्णेकर सर उपस्थित होते.