breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

DSK Kunjban : ‘डीएसके कुंजबन’ सोसायटीत आषाढी वारी उत्साहात

सोयायटीधाकरांनी दिला एकात्मतेचा संदेश : टाळ, पखवाज अन्‌ अभंगाने भक्तीमय वातावरण

पिंपरी : आधुनिक शिक्षण प्रणालीसह भारतीय संस्कृत आणि अध्यात्म याची ओळख नव्या पिढीमध्ये रुजावी. महाराष्ट्राला लाभलेली वैभवशाली संत परंपरा आणि संस्कारांचा वारसा पुढे चालावा, या संकल्पनेतून डीएसके कंजुबन हाऊसिंग सोसायटीच्या वतीने काढलेला ‘आषाढी वारी’ सोहळा उत्साहात पार पडला.

सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सोसायटीच्या आवारात वारीला सुरूवात झाली. भगवी पताका, टाळ, मृदंग, वीना आणि पखवाज वादनासह अभंगांच्या निनादात पादुका पालखी आणि विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीची वारी काढण्यात आली. सोसायटीतील रहिवशांनी पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी केली. सर्व जाती-धर्माच्या आणि राज्य-परराज्यात सोसायटीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी एकोप्याने हा उत्साव साजरा केला. सोसायटीचे सर्व सभासद आणि रहिवाशांनी मनोभावे प्रसाद वाटप केले.

रामायणाचार्य ह.भ.प. महावीर महाराज सूर्यवंशी यांनी कीर्तनातून रहिवाशांना आषाढी वारीचा इतिहास आणि महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. वारीतून मिळणारे ज्ञान आणि विज्ञान याचा ऊहापोह केला. पालखी सोहळ्याला ह. भ.प. मिरताई सूर्यवंशी, पखवाज वादक ह. भ. प. मल्हार महाराज गुळवे, वीणेकरी ह. भ. प. प्रधान महाराज काटे यांनी सेवा दिली.

सोसायटीचे चेअरमन योगेश सूर्यवंशी, सेक्रेटरी उत्तम नलावडे, खजिनदार युवराज पाटील आणि कमिटी सदस्य अभिजित वाळवेकर, संजय पाटील, अभिषेक पवार, संदीप पाटील, गौरव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले.

सांस्कृतिक समितीच्या भाग्यश्री सूर्यवंशी, नेहा वाळवेकर, आकांक्षा देसाई, प्रियांका दिवे-पाटील, विद्या जोशी, दिप्ती पाटील, प्रज्ञा पाटील, प्रिया म्हस्के, कविता पाटील, कविता थोरात, सुप्रिया लाटकर, सोनाली पवार, सीमा जोगळेकर, कस्तुरी केदारी, आदिती कुलकर्णी, कीर्ती हरीमणी यांच्यासह महिलांनी संयोजनात पुढाकार घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिकराव दिवे-पाटील यांनी केले. आयोजनामध्ये व्यवस्थापक श्रीधर पन्हाळकर आणि सुरक्षा व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी योगदान दिले.

बाल वारकऱ्यांचे उपस्थितांकडून कौतूक…

आषाढी वारी पालखी सोहळ्यात सोसायटीतील बालचुमींनी उत्साहाने सहभाग घेतला. बाळगोपाळ, वारकरी आणि संतांची वेशभूषा केलेल्या लहानग्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच, गारगी पाटील, वेदिका सावळे, जुई जोगळेकर, आराध्या दिवे-पाटील, ऋणी वाळवेकर, स्वराली पाटील, सई म्हस्के, विहान सूर्यवंशी, गिरीजा गायकवाड यांच्यासह बाल वारकऱ्यांनी अभंग, गीत आणि गणेश वंदना सादर केली. उपस्थितांनी बालकांचे कौतूक केले. अबालवृद्धांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि पालखी सोहळ्याची शोभा वाढवली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button