डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या पाठीशी मुस्लीम समाज वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचा सुलक्षणा शिलवंत यांना पाठींबा
मिशन विधानसभा : मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या पाठिशी असल्याचा दावा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/राज-ठाकरे-17-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणुन निवडणुक लढवित असलेल्या डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाने पाठींबा जाहिर केला आहे. त्यांच्या या पाठींब्यामुळे डॉ. शिलवंत यांच्या पाठीशी आता शहरातील मुस्लीम मतदारही उभा राहिला आहे. पक्षाचे पुणे जिल्हा सचिव सालार उमरसाहेब शेख यांनी पक्षाच्या वतीने पाठींब्याचे लेखी पत्र डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्याकडे सोपविले.
हेही वाचा – दादा कोथरुड मधून तू दणक्यात निवडून येणार!
विधान सभा निवडणुकीसाठी डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी उमेदवारी दाखल केल्या पासून अनेक संघटना आणि पक्षांनी त्यांना पाठींबा जाहिर केला आहे. आज वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने जाहिर केलेल्या पाठींब्यामुळे डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या विजयाचे गणित सोपे झाल्याची चर्चा आहे. वेलफअर पार्टी ऑफ इंडियाचे शहरातील सदस्य यापुढे डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या प्रचारामध्ये सक्रीय सहभागी होणार असल्याचेही श्री. सालार शेख यांनी दिलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे.
पिंपरी विधानसभा मतदार संघामध्ये मुस्लीम समाजाचे मतदान बरेच मोठे आहे. वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाने पाठींबा दिल्यामुळे हे मुस्लीम समाजाचे मतदान डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या पाठीशी आले आहे