breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Dr. Dadi Ratan mohini : दादा रतनमोहिनीजींच्या सत्कारामुळे शहरवासीयांना पुण्यकर्म करण्याची प्रेरणा : आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

दादींच आपल्या शहरात झालेले आगमन व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेल्या ब्रम्हाकुमारी राजयोगिनी डॉ. दादी रतनमोहिनीजी यांच्या सत्कारमधून शहरावासियांना पुण्यकर्म करण्याची नक्कीच प्रेरणा मिळणार आहे, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्‍तकेले.

        पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने बालाजी लॉन्स काळेवाडी येथे ब्रम्हाकुमारी राजयोगिनी डॉ.दादी रतनमोहिनीजी यांना त्याच्याहस्ते मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

        महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्य संतोष कोकणे, संदिप वाघेरे, सागर आंगोळकर, नगरसदस्यानिता पाडाळे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसदस्या गिरिजा कुदळे, जवाहर कोटवाणीप्रभागाचे नामनिर्देशित सदस्य संतोष ढोरे, प्रबोधनकार शारदा मुंढे, ब्रम्हाकुमारी सुरेखा दिदी, पारु दिदी, उर्मिला दिदी, उषा दिदी, लिला दिदी व बहुसंख्येने साधक व शहरवासीय नागरिक उपस्थित होते.

        यावेळी ब्रम्हाकुमारी राजयोगिनी डॉ.दादी रतनमोहिनीजीम्हणाल्या जे काही आपण चांगल ऐकतो, आस्मसात करतो त्याचप्रमाणे आपले जीवन व्यथित होत असते. आपल्या मनाच्या गाभा-यामध्ये आध्यात्मिक विचार असला पाहिजे त्याकरीता आपण सर्वांनी ध्यानधारणा करावी असेही त्या म्हणाल्या.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले पिंपरी चिंचवड नगरी ही कष्टक-यांची नगरी म्हणून ओळखली जाते. या कष्टक-यांच्या नगरीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवराय वमोरया गोसावी यांच्या विचारांचा वसा जोपासला जातो.आज शहरवासीयांच्या वतीने आपण दादींचा सत्कार केल्याने ख-या अर्थाने आज संपुर्ण शहरवासीयांचा गौरव झालेला आहे असेही ते म्हणाले.

        महापौर उषा उर्फ माई ढोरे यावेळी म्हणाल्या संत मंडळी जीवनाची दिशा दाखविण्याचे महंत कार्य करीत असतात. पिंपरी चिंचवड शहर ही संतांच्या विचारांची भूमी आहे. आणि ही भूमी संतांचीच असल्याचे काम शहरवासीयांकडून होत असते, असेही त्या म्हणाल्या.

        मानपत्राचे वाचन जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले यांनी केले. सुत्र संचालन संजय शिंदे यांनी केले. तर आभार अनुप पाटील यांनी मांडले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button