Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डॉ. डी वाय पाटील विद्यापीठ आता “ज्ञान प्रसाद ग्लोबल यूनिव्हर्सिटी”!

उच्च शिक्षण क्षेत्रात जागतिक दृष्टिकोन, नाविन्यपूर्ण व भविष्याभिमुख नावात बदल

पिंपरी : डॉ. वाय. पाटील ज्ञान प्रसाद युनिव्हर्सिटी आता नव्या रूपाने नावारूपाला येत आहे. वि‌द्यापीठाचे नाव बदलून ज्ञान प्रसाद ग्लोबल यूनिव्हर्सिटी असे ठेवण्यात आले असून हे विद्यापीठ डॉ. डी. वाय पाटील यूनिटेक सोसायटीचा एक घटक असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. सोमनाथ पी. पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रोहिणी एस. पाटील यांनी सांगितले.

ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीची घोषणा गुरुवारी करण्यात आली. यावेळी प्र-उपकुलगुरू डॉ. धीरज अग्रवाल, डॉ. मोहन वामन, कुलसचिव डॉ. अतुल कुमार आधी उपस्थित होते.

यावेळी सोमनाथ पाटील म्हणाले, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी ही डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीने निर्माण केलेली नवीन जागतिक ओळख आहे. या नवनिर्मिती मागे डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. पी. डी. पाटील साहेब व डॉ. भाग्यश्री पाटील यांचे परीश्रम व डॉ. रोहिणी पाटील यांच्या दृष्टिकोनाचा परिपाक आहे.

हेही वाचा – मोहन भागवतांच्या उपस्थितीत संघाची उच्चस्तरीय बैठक; ‘या’ महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा

डॉ. वाय. पाटील ज्ञान प्रसाद युनिव्हर्सिटी आता नव्या रूपाने नावारूपाला येत आहे. वि‌द्यापीठाचे नाव बदलून ज्ञान प्रसाद ग्लोबल यूनिव्हर्सिटी असे ठेवण्यात आले असून हे विद्यापीठ डॉ. डी. वाय पाटील यूनिटेक सोसायटीचा एक घटके आहे. हा बदल उच्च शिक्षण क्षेत्रात जागतिक दृष्टिकोन, नाविन्यपूर्ण व भविष्याभिमुख विचारसरणीकडे वाटचाल करण्याचा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. विद्यापीठाची ही नवी ओळख सातत्य आणि प्रगती या दोन्हींचे प्रतिक आहे. ज्ञान आणि विद्याा हे या संस्थेचा आत्मा आहेत्र ग्लोबल हा शब्द विद्यापीठाच्या नव्या वचनबद्धतेचे ‌द्योतक आहे.

डॉ. सोमनाथ पाटील पुढे म्हणाले “ही बदलाची प्रक्रिया केवळ नामांतरापुर्ती नाही. तर ध्येय आणि दिशाचे पुनः स्मरण आहे. ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी ज्ञान आणि उदात्त उ‌द्दिष्टांचे मूल्ये कायम राखत आता अधिक व्यापक आणि जागतिक दृष्टिने विद्यार्थ्यांना तयार करेल. आजचे शिक्षण वर्गापुरते मर्यादित न राहता. स्थानिक विचारांना जागतिक संधीशी जोडणारे असावे.”

डॉ. रोहिणी पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी यांनी सांगितले “या विद्यापीठाचा पाया डॉ. डी. वाय. पाटील यूनिटेक सोसायटीच्या चार दशकांच्या शैक्षणीक उत्कृष्टतेवर आधारित आहे. ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी म्हणून आम्ही आता नव्या दृष्टिकोनासह पढे जात आहोत. जागतिक क्षितिजाचा विस्तार, शिक्षणात नवकल्पनाचा समावेश आणि उत्कृष्ट नेतृत्व या नव्या दृष्टिकोनासह आम्ही पुढे जाणार आहेत.जेव्हा भारतातील उच्च शिक्षण क्षेत्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत वेगाने बदल होत असताना या धोरणात लवचिकता, बहविषयक शिक्षण आणि आंतराष्ट्रीय सहकार्य यावर भर देत आम्ही या वि‌द्यापीठाच्या नामांतराचा निर्णय घेतला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

आगामी काळात ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी संशोधनातून जागतिक पातळीवर ठसा उमटवणे.उद्योगांशी सलग्न अभ्यासक्रमां‌द्वारे नाविण्यपूर्ण व भविल्याभिमुख शिक्षण देणे.भारताला जागतिक शिक्षणकेंद्र म्हणून बळकट करणे ही प्रमुख तीन उदिष्ट डोळयासमोर ठेवून काम करेल. ज्ञान म्हणजेच विद्या आणि प्रसाद म्हणजे विद्येचे अर्पण करणे या मुलभूत मुल्यांवर आधारित शिक्षण हे या वि‌द्यापीठाचे अविल्यकाळातील ध्येय असेल.

– डॉ.सोमनाथ पाटील, प्र-कुलगुरू

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button