डॉ. डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला मायक्रोसॉफ्टमध्ये दहा लाखांचे पॅकेज!
-शिक्षण विश्व : पिंपरी चिंचवड मधील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी यश

पिंपरी चिंचवड: वराळे येथील डॉ डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड इनोव्हेशन येथील विद्यार्थिनी वैभवी विनय माने हिने प्रतिष्ठित मायक्रोसॉफ्ट या आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये दहा लाख वार्षिक पॅकेजसह मिळवलेल्या नियुक्तीमुळे महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण आहे. महाविद्यालयाच्या प्लेसमेंट इतिहासातील हे आणखी एक उल्लेखनीय पाऊल ठरले आहे
वैभवीच्या या यशाबद्दल चेअरमन डॉ सुशांत पाटील, सचिव अॅड अनुजा पाटील, प्राचार्य डॉ सुरेश माळी, सेंट्रल प्लेसमेंट ऑफिसर प्रा संतोष राव बोर्डे विभागप्रमुख डॉ अल्पना अडसुळ, प्लेसमेंट ऑफिसर, प्रा आशीष जावके तसेच राहुल दुबे यांनी अभिनंदन व्यक्त केले
हेही वाचा – राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत दिमाखदार यश
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी यश
महाविद्यालयात उपलब्ध अत्याधुनिक डिजिटल लॅब्स इनोव्हेशन सेंटर आणि करिअर ओरिएंटेड प्रशिक्षण पद्धतींचा योग्य वापर करीत वैभवीने तांत्रिक कौशल्य आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांच्या जोरावर ही अतिशय प्रतिष्ठेची संधी मिळवली आहे तिची धडाडी मेहनत आणि शिस्तबद्ध काम करण्याची वृत्ती यामुळे ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे अशी भावना पालक शिक्षकांनी व्यक्त केली.



