Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

व्ही के माटे हायस्कूलमध्ये स्काऊट गाईड पथकासाठी “खरी कमाई” उपक्रम

शिक्षण विश्व: विद्यार्थ्यांच्या व्यवसायिक कौशल्याला मिळाला भरघोस प्रतिसाद

पिंपरी चिंचवड: चिंचवड व्ही के माटे प्रशालेतील क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद स्काऊट पथक आणि झाशीची राणी गाईड पथकातर्फे आयोजित खरी कमाई हा उपक्रम उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले खाद्यपदार्थ विक्री करून उपक्रम यशस्वी करण्यास मोठा प्रतिसाद मिळाला

उपक्रमाचे उद्घाटन मोरया शिक्षण संस्थेच्या विश्वस्त कार्यवाह तथा प्राचार्या इंद्रायणी माटे पिसोळकर आणि संस्थेचे खजिनदार तसेच विश्वस्त रणजीत सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून खाद्यपदार्थ खरेदी करत लॉर्ड बेडन पॉवेल दालनाचे उद्घाटन केले

स्काऊट गाईड विभाग प्रमुख हनुमंत हुचगोळ यांनी या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना खरेदी विक्री, नफा,तोटा, व्यवसाय व्यवस्थापन ,मागणी, पुरवठा पूर्वतयारी, आर्थिक,देवाणघेवाण आणि व्यवहार कौशल्य प्रत्यक्ष अनुभवातून शिकता यावे हा हेतू असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पुजारी यांनी केले.तर आभारप्रदर्शन अनिल तिटकरे यांनी केले.

हेही वाचा –  राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत दिमाखदार यश

शिक्षकांनी घेतला विविध पदार्थांचा आस्वाद

विद्यार्थ्यांनी ओली भेळ, सुकी भेळ,केक, पायनॅपल ज्यूस आवळा कॅन्डी, सँडविच, मसाला दूध अशा विस्तवाशिवाय बनवलेल्या पदार्थांसह वडापाव, सामोसे, इडली चटणी गोलगप्पे अप्पे असे विविध चविष्ट पदार्थ स्वतः तयार करून विक्रीस ठेवले. इयत्ता सहावी आणि सातवीतील स्काऊट व गाईडच्या एकूण 150 विद्यार्थ्यांनी स्टॉल लावले होते पाचवी ते दहावीतील विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला दोन दिवसांत विद्यार्थ्यांनी मिळून वीस हजार रुपये खरी कमाई केली.उपक्रमाला

उत्स्फूर्त प्रतिसाद

या उपक्रमाला पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या यशात स्काऊट मास्टर आणि गाईड कॅप्टन अश्विनी पुजारी , अनिता बोरसे, मनीषा लोहार, उषा उजळंबकर यांच्यासह स्वयंसेवक विद्यार्थ्यांचा मोठा वाटा होता ,श्लोक चिंचवडे ,अमरदीप बिरादार, स्वप्निल काळमे, शिवतेज नलवडे, राज देशपांडे अदिती इगावे यांनी विशेष मेहनत घेतली तर फलक लेखनाची जबाबदारी श्रीतेजा पांचाळ आणि प्रतीक्षा खोत यांनी सांभाळली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button