शहराच्या नेतृत्त्वाला सोबत घेऊन विकासकामे करा- प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
![Do development work with the leadership of the city - State President Chandrakant Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/WhatsApp-Image-2021-03-07-at-4.27.41-PM.jpeg)
- नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांना सल्ला
- पिंपरी-चिंचवडमधील शहर भाजपामध्ये एकोप्याचा संदेश
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील भाजपाचे दोन्ही नेते आमदार लक्ष्मण जगताप आणि शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे या दोघांना सोबत घेवून शहरातील विकासकामे मार्गी लावा, असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे यांना दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक नुकतीच झाली. सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक ॲड. नितीन लांडगे यांची बहुमताने सभापतीपदी निवड झाली.
यापार्श्वभूमीवर ॲड. नितीन लांडगे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस विजय फुगे आदी उपस्थित होते.
ॲड. नितीन लांडगे म्हणाले की, शहराचे नेते आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने मला स्थायी समिती सभापतीपदी काम करण्याची संधी दिली आहे. पक्षातील सर्व नगरसेवक आणि दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाने शहरातील विकासकामे मार्गी लावून पदाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
वाचा- उस्मानाबाद तालुक्यात घाटंग्री तांडा परिसरात एक बिबट्या आढळला मृतावस्थेत