breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेना-युवासेनेच्या वतीने वारकऱ्याना पाच हजार बॅगचे वाटप

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते वारकरी बांधवांना बॅग आणि टॉवेलचे वाटप

मंत्री चंद्रकांतदादा पाटील, युवासेनेचे राज्य सचिव किरण साळी यांची प्रमुख उपस्थिती

पुणे | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या दोन्ही पालख्यांचे आगमन झाले. यावेळी शिवसेना-युवा सेना, पुणे शहर यांच्या वतीने दोन्ही पालख्यांचे स्वागत करताना पाच हजार बॅग व टॉवेलचे वारकरी बंधूना वाटप करण्यात आले.
वारकरी बांधवांची सेवा घडावी, या उद्देश्याने उपक्रमाचे आयोजन शिवसेना – युवासेनेचे शहरप्रमुख निलेश गिरमे यांच्या वतीने करण्यात आले होते. शनिवारी शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाची प्रातिनिधिक स्वरुपात सुरुवात करण्यात आली होती.

आज फर्ग्युसन महाविद्यालय येथील संत तुकाराम महाराज मंदिराच्या समोर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिवसेना युवासेनेचे राज्य सचिव किरण साळी, भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, यांच्यासह महायुतीच्या अनेक नेते, कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले.

हेही वाचा    –      महादेव जानकरांनी वाढवली महायुतीची चिंता, विधानसभेसाठी ‘इतक्या’ जागांची मागणी

याविषयी बोलताना राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, शिवसेनेच्या वतीने या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेकदा वारकरी ऊन, पावसाची तमा न बाळगता, विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने वारी करतात. अशा वेळी आज शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेली बॅग, ही वारकरी बांधवासाठी मोलाची भेट असणार आहे.

या उपक्रमाला केंद्रीय केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुभेच्छा देताना वारकरी बांधवांना बॅग आणि टॉवेलचे वाटप केले.

उपक्रमाविषयी बोलताना शिवसेना-युवसेनेचे शहरप्रमुख निलेश गिरमे म्हणाले, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशी महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. गेल्या अनेक शतकांपासून ही परंपरा अविरत सुरु आहे. विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेला वारकरी हा भक्तीची आणि धर्माचे प्रतिक आहे. अशा संतांचे पूजन व्हावे, वारी सुखकर व्हावी, याच उद्देश्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा उपक्रम यशश्वी होण्यासाठी युवासेनेचे जितु जंगम, गणेश चव्हाण, उमेश राजपूत, हृतिक गोलांडे, धनंजय जाधव, विजय कणसे, राम तोरकडी, लोकेश राठोड, गणेश राठोड, मंथन कोळेकर, आकाश चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मोलाचा वाटा उचलला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button