breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धम्मराज साळवे यांनी दिला ‘एमआयएम’ पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी :  धम्मराज साळवे यांनी एमआयएम पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदासह पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

धम्मराज साळवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दि.३१ मार्च २०१६ रोजी AIMIM पक्षाचे नेते अकील मुजावर यांच्या नेतृत्वात दमराज साळवे यांची पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते पदी नियुक्ती  झाली होती. तेंव्हापासून आजपर्यंत गेली ०८ वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी पक्षाच्या ध्येय धोरणाशी एकनिष्ठ राहून पक्षासाठी काम केले आहे. पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष या पदांवर ते कार्यरत होते.

२०१६ पासून AIMIM पक्षाच्या माध्यमातून जनहिताचे मुद्दे घेऊन अनेक आंदोलन मोर्चे केले. तसेच शैक्षणिक, रोजगार, महिला सक्षमीकरण, आरोग्य अश्या सर्वच क्षेत्रात सातत्याने विविध कार्यक्रम, जनजागृती असेल अश्या सर्वच स्तरावर मोठ्या प्रमाणात काम केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राज्य सरकार यांच्यासोबत पत्रव्यवहार करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम असेल, दलित मुस्लिम समाज यांच्यावरील अन्याय अत्याचाराची प्रकरणे असतील तसेच भ्रष्टाचाराची प्रकरणे असतील याविरोधात सातत्याने रस्त्यावरील व कायदेशीर संघर्ष देखील धर्मराज साळवे यांनी केला आहे केला आहे.

हेही वाचा – Ground Report । अजित गव्हाणेंचा झाला ‘अभिमन्यू’ : माजी आमदार विलास लांडे यांनी बंडाच्या फुग्यातील हवा काढली!

८ वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात पक्षाचे काम चालू आहे. परंतु अद्याप एकदाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची सभा भेटली नाही. तसेच पक्षातील अन्य इतर कोणत्याही वरिष्ठ नेत्यांची सभा शहराला भेटली नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे पक्ष वाढीकरिता अनेक वेळा राष्ट्रीय अध्यक्षांची सभा व्हावी म्हणून विनंती केली. मागणी केली, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. किमान महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी तरी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून दलित मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडवले जावे याकरिता आयुक्तांची भेट घ्यावी, यासाठी अनेक वेळा सूचना केल्या. त्यावर देखील कसलाही प्रतिसाद मिळाला नाही.‌ वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे आज पिंपरी चिंचवड शहरात AIMIM पक्ष संपुष्टात आला आहे. केवळ एकाकी संघर्ष करून वर्तमानपत्रातून बातम्यांद्वारे, सामाजिक प्रश्नाद्वारे पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे प्रयत्न आतापर्यंत करण्यात आले.‌ परंतु वरिष्ठांच्या या दुर्लक्षामुळे AIMIM पक्ष म्हणजे केवळ निवडणुकीपुरता अशी प्रतिमा जनमानसात निर्माण झाली असल्याची भावना धम्मराज साळवे यांनी व्यक्त केली आहे.

AIMIM पक्षात सहभागी करून घेण्यापूर्वी मला अनेक आश्वासने देण्यात आली. परंतु ०८ वर्षात ती आश्वासने पाळण्यात आली नाही. मी शहराध्यक्ष असताना देखील माझ्या अधिकारातील काही गोष्टींचे निर्णय मला न कळवताच घेतले गेले. AIMIM पिंपरी चिंचवड शहरातील पक्ष म्हणजे कोणाला तरी जिंकवण्यासाठी व कोणाला तरी हरवण्यासाठी काम करतोय असे मला जाणवू लागले आहे.

AIMIM पक्षाकडे कोणतेही विकासात्मक धोरण दिसून येत नाहीत. अनेक वेळा राज्यस्तरीय बैठका घेण्यात आल्या त्यामध्ये आमच्या वतीने अनेक वेळा सूचना उपाय सांगण्यात आले. परंतु बैठका पार पडल्यानंतर त्यावर कोणतीही अंमलबजावणी झाली नाही म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. बॅ. असददुद्दीन ओवेसी, सय्यद इम्तियाज जलील (अध्यक्ष -महाराष्ट्र प्रदेश),  अकील मुजावर (अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र) यांचेकडे राजीनामा सुपूर्द केला असल्याचे धम्मराज साळवे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button