Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिघीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी

भाजपा नगरसेविका श्रुती डोळस यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

दिघी परिसराच्या सुशोभीकरणासाठी आणि शहराच्या प्रवेशद्वाराला ऐतिहासिक ओळख मिळावी यासाठी नगरसेविका श्रृती विकास डोळस यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे. दिघी गावाच्या सुरुवातीला जकात नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दिघी हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पूर्वेकडील शेवटचे टोक असून, पुण्याकडून श्रीक्षेत्र आळंदीकडे जाणाऱ्या मार्गावरील महत्त्वाचे प्रवेशद्वार मानले जाते. या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, प्रवासी तसेच वारकरी ये-जा करत असतात. त्यामुळे या ठिकाणी शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारल्यास परिसराची ओळख अधिक ठळक होईल, असे नगरसेविका डोळस यांनी निवेदनात नमूद केले आहे.

हेही वाचा –  ‘यूपीएससी’च्या निकालात राज्यातील उमेदवारांचा डंका; किती मराठी उमेदवारांची निवड?

यासोबतच जकात नाका चौकाचे आधुनिक पद्धतीने सुशोभीकरण करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे. पुतळ्याच्या सभोवताल आकर्षक विद्युत रोषणाई, कारंजे, वृक्षारोपण आणि सुबक रचना करून हा चौक शहरातील एक आकर्षण केंद्र बनवता येईल, असे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

नगरसेविका श्रृती डोळस या आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून, त्या माजी नगरसेवक तथा भाजपाचे सरचिटणीस विकास डोळस यांच्या सौभाग्यवती आहेत. या प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेलच, शिवाय येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना आणि तरुण पिढीला Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या जाज्वल्य इतिहासाची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच महानगरपालिकेने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी विनंतीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“दिघी हे पिंपरी-चिंचवड शहराचे पूर्वेकडील महत्त्वाचे प्रवेशद्वार असून, या ठिकाणाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख मिळणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारल्यास परिसराचे सौंदर्य वाढेल आणि येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना शिवरायांच्या पराक्रमाची सतत प्रेरणा मिळेल. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव पुढे नेऊन प्रशासनाच्या सहकार्याने हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

– श्रुती डोळस, नगरसेविका, भाजपा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button