सर्व शिक्षा अभियानांतर्गत पालिकेकडून बालभारतीकडे पुस्तकांची मागणी…
![Demand for books from Balbharati by the municipality under Sarva Shiksha Abhiyan ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Balbharti.png)
- मात्र, पहिल्या आठवड्यात पुस्तके मिळण्याची शक्यता कमीच…
पिंपरी |
सर्व शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी महापालिका, अनुदानित, विनाअनुदानित व खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी महापालिकेने ९८८ पुस्तकांची मागणी बालभारतीकडे केली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेला पुस्तके मिळत असतात. परंतु, यंदा बालभारतीकडून पुस्तक छपाईला उशीर होत असल्याने पुस्तके वेळेत मिळण्याची शक्यता कमी आहे.
दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात शहर साधन केंद्राअंतर्गत आकुर्डी केंद्रासाठी अनसुया वाघेरे इंग्रजी विद्यालय, तर पिंपरी केंद्रासाठी विद्या निकेतन महापालिका विद्यालय व कर्मवीर भाऊसाहेब पाटील विद्यालय या शाळांमध्ये ही पुस्तके ठेवण्यात येतात. या केंद्रांच्या अखत्यारितील शाळांमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात पुस्तके वितरित करण्यात येतात. मराठी ४८२८७, इंग्रजी १२२४५, हिंदी २१८७४, उर्दू १६४८२ अशी एकूण ९८,९८८ पुस्तके पालिकेने मागवली आहेत.