ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण

आमदार महेश दादा लांडगे यांच्या उपस्थितीत लोकापर्ण सोहळा संपन्न
चिखली |परिसरातील सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्या संकल्पनेतील दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. आमदार महेश दादा लांडगे तसेच परिसरातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.चिखली घरकुल परिसरात अखंड हरिनाम सप्ताह घेण्यात आला. त्या दरम्यान ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि विठु-माऊलींच्या साक्षीने दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला. सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे वाटप परिसरातील नागरिकांना सुरु कऱण्यात आले आहे. त्यानिमित्ताने नागरिकांशी सुसंवाद साधला जात आहे.


याबाबत अधिक माहिती देताना निलेश नेवाळे म्हणाले, दिनदर्शिकेचे वाटप करताना परिसरातील नागरिकांशी सुसंवात तसेच त्यांच्या ज्या काही समस्या असतील, त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील, त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button