चिखली-घरकुलमध्ये येथे दहीहंडी उत्सहात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Newale-2.jpg)
प्रेक्षकांची तुफान गर्दी: सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांचा पुढाकार
पिंपरी । महाईन्यूज विशेष प्रतिनिधी ।
चिखली घरकूल वसाहत येथे निलेशदादा नेवाळे सोशल फाउंडेशन व शिवरक्त प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते निलेशदादा नेवाळे यांच्या नेतृवाखाली घरकुल येथे शुक्रवारी (दि.19) मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. ही दहिहंडी मुंबई येथील साई सिद्धी दहीहंडी पथक, चेंबूर यांनी फोडली.
या कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, चिखली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर, अभिनेत्री मीरा जगन्नाथ, भाजपचे नेते एकनाथ पवार, जेष्ठ कामगार नेते विष्णुपंत नेवाळे आणि घरकुलमधील विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
चिखली, घरकूल, नेवाळे वस्ती, हरगुडेवस्ती, कोयनानगर, घरकुल येथील परिसरातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी युवक, युवती, महिला व नागरिक या उत्सहात कार्यक्रमात सामील झाले होते. यावेळी एन.एस. डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम डान्स करत उपस्थितांची मने जिंकली. निलेशदादा नेवाळे सोशल फाउंडेशन व शिवरक्त प्रतिष्ठान आणि मल्हार ढोल ताशा पथक घरकुल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.