ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहीहंडी उत्साहात

विद्यार्थ्यांकडून ‘‘जय कन्हैया लाल की..’’चा जयघोष

राधाकृष्ण यांच्या वेशभूषेतील ‘सेल्फी पॉईंट’चे आकर्षण

पिंपरी । प्रतिनिधी

‘‘हाथी घोडा पालखी…. जय कन्हैया लाल की..’’ हा जयघोष, विद्यार्थ्यांनी केलेली राधाकृष्ण यांची आकर्षक वेशभूषा, दहीहंडी फोडण्यासाठी बाल गोपाळांकडून लावले जाणारे थर… अशा उत्साहाच्या वातावरणात स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल, मोशी येथे दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

सकाळपासूनच बाळ गोपाळांची लगबग सुरू होती. दहीहंडी फोडण्याची त्यांची उत्सुकता शिगेला पोचली. पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक अशा वेगवेगळ्या स्तरातील विद्यार्थ्यांची स्वतंत्र दहीहंडी आयोजित करण्यात आली. श्रीकृष्णाचा पाळणा गाऊन जन्मोत्सव साजरा केला. यावर्षी राधाकृष्ण यांच्या वेशभूषेतील ‘सेल्फी पॉईंट’ हे महत्त्वाचे आकर्षण ठरले. संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष विनायकराव भोंगाळे व इतर सभासद यांनी सर्व बाळगोपाळांना शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यवस्थापकीय संचालक कविता भोंगाळे कडू-पाटील, विश्वस्थ सरिता विखे-पाटील उपस्थित होत्या.

हेही वाचा – मराठा आरक्षणाकरिता निमगाव चोभा येथे आमरण उपोषण सुरू

या कार्यक्रमासाठी संस्थेच्या विशेष कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली भागवत ,एसएससी विभागाच्या उपमुख्याध्यपक सौ प्रिया नेवाले व त्यांच्या टीम ने मार्गदर्शन केले . विद्यार्थ्यांच्या नृत्याने व जल्लोषाने परिसरातील सर्वच वातावरण आनंदमय झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button