breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठा आरक्षणाकरिता निमगाव चोभा येथे आमरण उपोषण सुरू

सरपंच, उपसरपंचासह गावकऱ्यांचं आमरण उपोषण

अमित शेळके : प्रतिनिधी

निमगाव चोभा : अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी निमगाव चोभा येथे गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन आणि बंदची हाक देण्यात येत आहे.

निमगाव चोभा येथे उपसरपंच विजय शेळके, सचिन गाडे आणि कांतीलाल गिऱ्हे हे उपोषणाला बसलेले आहेत. ‘जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर माघार घेणार नाही’, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. राज्य सरकारचा निषेध म्हणून निमगाव चोभा येथील ग्रामस्थांनी सरकारचा दशक्रिया विधी करून युवकांनी मुंडन केले आहे. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. विशेष बाब म्हणजे राज्य सरकारच्या प्रतिकात्मक दशक्रिया विधी वेळी पिंडाला कावळा शिवल्याचे पहायला मिळाले.

हेही वाचा – ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळतात’; प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप

निमगाव चोभा येथील सर्व ग्रामस्थांनी तसेच शेजारील गावांनी उपोषणाला समर्थन दिलेले आहे. राज्यभरात ठिकठिकाणी युवक आमरण उपोषण करत असल्यामुळे राज्य सरकार वरील दबाव वाढत आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button