#COVID19: कोरोना रुग्णाने माहिती लपवली; डॉक्टरसह 40 जण क्वारंटाईनमध्ये!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/5-4.jpg)
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
कोरोना बाधित रुग्णाने माहिती लवल्यामुळे डॉक्टरसह ४० जणांना क्वारंटाईनमध्ये रहावे लागले आहे. असा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे. यात काही सर्जन आणि डॉक्टरांचा समावेश आहे. त्या सगळ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. या डॉक्टरांनी एक रुग्णाची सर्जरी केली होती. या सर्जरीदरम्यान रुग्णाच्या काही टेस्ट केल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णाने आपली माहिती लपवल्यामुळे त्याचा मोठा फटका डॉक्टरांना बसला आहे.
या रुग्णाचा एक अपघात झाला होता. त्यामध्ये इंटरनल ब्लिडिंग झाल्यामुळे त्याची सर्जरी करावी लागली. त्यानंतर दोन दिवस त्याला ताप येत होता. डॉक्टरांनी या रुग्णाच्या काही टेस्ट केल्यानंतर शनिवारी त्याचा रिपोर्ट आला. या रिपोर्टमध्ये तो कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे समजल्यानंतर त्याच्यावर सर्जरी करणाऱ्यांसह इतर डॉक्टरांनाही ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. या ४० डॉक्टरांच्या थुंकीचे आणि काही ब्लड सँपल्स तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला डॉक्टरांनी या रुग्णाच्या कुटुंबीयांना आणि रुग्णाला ट्रॅव्हल हिस्ट्री विचारली असता त्यांनी नकार दिला होता. त्यावेळी कोणीही बोलायला तयार नव्हते. ताप आल्यानंतर त्याच्या आईने दिल्लीला जाऊन आल्याचा खुलासा केला. या ४० पैकी ३० जण हे रुग्णालयातील स्टाफ तर १० डॉक्टरांचा समावेश आहे. त्या सर्वांचे सॅपल्स पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.