breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

COVID 19 : शहरात आज ९ जणांना कोरोनाची बाधा, पिंपळे सौदागरला ठोकले सील

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमध्ये आज शनिवारी एकूण ९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे रुग्ण फुगेवाडी, पिंपळे सौदागर, चिंचवड स्टेशन आणि रुपीनगर या भागातील आहेत. त्यामुळे महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ६३ झाली आहे. तसेच आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांची एकूण संख्या १९५ वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण ११९ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकानुसार शनिवारी दिवसभरात कोरोनाचे ९ रुग्ण आढळले आहेत. फुगेवाडी, पिंपळे सौदागर, चिंचवड स्टेशन आणि रुपीनगर या भागातील हे रुग्ण आहेत. आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमधील १९५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ११९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच कोरोनामुळे शहरातील चौघांचा बळी गेला आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ६३ आहे.

कोरोना रुग्ण आढळल्यामुळे महापालिकेने पिंपळेसौदागर येथील साई पॅराडाईज, साई साहेब सोसायटी अंतर्गत रस्ता, न्यू पूना बेकरी, शिवसाई लेन रोड हा परिसर तसेच रूपीनगरमधील पंचदुर्गा सहकारी गृहनिर्माण संस्था, सिद्धीविनायक गणपती मंदिर, मिनारा मशीद, मावली मेडीकल, हमराज टेलर्स, रुपीनगर पोस्ट ऑफिस, रुपीनगर रोड हा परिसर आज मध्यरात्री ११ वाजल्यापासून सील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास आणि बाहेरील नागरिकांना या भागात येण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. तसेच या भागातील नागरिकांनी अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडल्यास तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button