Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
#COVID 19 : पालिकेच्या उपाययोजनांची केंद्र शासनाच्या पथकाने केली पाहणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/A-Gallery_30-1.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या कोवीड १९ कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी केंद्रशासनाच्या पथकाने आज महापालिका क्षेत्रात पाहणी केली.
यावेळी केंद्र शासनाच्या पथकाचे प्रमुख अतिरिक्त सचिव संजय मल्होत्रा समवेत अतिरिक्त महासंचालक डाॅ. पी. के. सेन, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे सह सल्लागार डाॅ. पवनकुमार सिंग, अतिरिक्त वरिष्ठ सहाय्यक डाॅ. अरविंद अलोने, अन्न व वितरण विभागाचे संचालक करमवीर सिंग यांचा समावेश होता.
यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, आरोग्य वैदयकिय अधिकारी डाॅ. के. अनिल राॅय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डाॅ. पवन साळवे, डाॅ. वर्षा डांगे आदि उपस्थित होते.