breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
COVID 19 : आज आणखी 41 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह, वैद्यकीय विभागासमोर आव्हान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/shutterstock_726354721-min-4.jpg)
पिंपरी | महाईन्यूज| प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील विविध भागातील 41 जणांचे रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आले आहेत. 30 पुरुष आणि 11 महिलांचा त्यात समावेश आहे. सकाळी साडेअकरा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 354 वर गेली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला रेडझोनमधून वगळ्यात आले आहे. शुक्रवारपासून शहरातील निर्बंध शिथील केले आहे. परंतु, रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली. एकाचदिवशी 21 जणांचे तर शनिवारी 46 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. तर आज 41 रुग्ण वाढल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.