नगरसेवक तुषार हिंगे यांची भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी निवड
![Corporator Tushar Hinge elected as BJP Yuva Morcha Maharashtra Pradesh Executive West Maharashtra Liaison Officer](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/WhatsApp-Image-2021-07-19-at-11.58.50-AM.jpeg)
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजप नगरसेवक, माजी उपमहापौर तुषार हिंगे यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी मध्ये पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिले.
नियुक्ती झाल्यानंतर नगरसेवक तुषार हिंगे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की मी आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात भारतीय जनता युवा मोर्चाचे संघटन वाढविण्यासाठी तसेच युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व जास्तीत जास्त युवांना भाजपमध्ये सामील करण्यासाठी अथक परिश्रम घेऊन पक्षवाढीसाठी नेहमीच कार्यरत राहणार.
यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनुप मोरे उपस्थित होतेसदर निवडीनंतर नगरसेवक तुषार हिंगे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.