कोरोनाग्रस्त रुग्णांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात मिळणार मोफत प्लाझ्मा; भाजपा युवा मोर्चाच्या मागणीला यश
![Corona patients will receive free plasma at the municipal YCM hospital; Success to the demand of BJP Yuva Morcha](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/bjum.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
जनमाणसांची भावना लक्षात घेत सकारात्मक विचार करून पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेद्वारा आज मोफत प्लाझ्मा पुरवठा करण्याचा लोकहिताचा निर्णय घेण्यात आला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाची संख्या वाढती आहे. महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या दवाखान्यांवर ताण आले असल्यामुळे नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे. अशा वेळी प्लाझ्माची प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. प्लाझ्मा या लढ्याचा प्रमुख शस्त्र मानला जातो. तसेच त्याचा वापर करून कोरोना ग्रस्त व्यक्तींना बरे करता येणे शक्य आहे.
परंतु प्लाझ्मा दात्यांची कमतरता भासू लागली असताना रुग्णांच्या नातेवाईकांचा कल हा महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रक्तपेढी कडे जास्त आहे.
पण मग पहिल्या लाटेच्या तुलनेत आता राज्य सरकारच्या नियमानुसार प्लाझ्मासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रक्तपेढीत सुद्धा सहा हजार रुपये द्यावे लागत आहे. अशावेळी आधीच खाजगी रुग्णालयातील उपचार घेणाऱ्या लोकांवरती हा अधिकचा आर्थिक भार पडत होता. याचीच दखल घेत भारतीय जनता युवा मोर्चा शहराच्या वतीने भाजपा आमदार महेश लांडगे, महापौर माई ढोरे व स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्याकडे प्लाझ्मा मोफत करण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली होती.
त्या मागणीला आज खऱ्या अर्थाने यश प्राप्त झाले असून आम्ही आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे व स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांचे युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करून आभार व्यक्त करण्यात आले.