ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

विकसित भारत २०४७ च्या स्वप्नपूर्तीसाठी योगदान द्या: ज्योतिरादित्य सिंधिया

शिक्षण विश्व: डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा (डीपीयु) 17 वा पदवीप्रदान समारंभ

पिंपरी-चिंचवड, पुणे | डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे (अभिमत विद्यापीठ) येथे 17 वा पदवीप्रदान समारंभ उत्साहात संपन्न झाला. या समारंभासाठी मा. श्री. ज्योतिरादित्य एम. सिंधिया, केंद्रीय दळणवळण मंत्री आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री, भारत सरकार हे पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. डॉ. पी. डी. पाटील कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे यांनी भूषविले. या कार्यक्रमात मा. डॉ. (ब्रिगे.) अमरजित सिंग (निवृत्त) माजी प्रभारी कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि माजी अधिष्ठाता, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे तसेच मा. डॉ. ए. एल. काकराणी वैद्यकीय क्षेत्रातील प्रख्यात प्राध्यापक तसेच संचालक – शैक्षणिक सहयोग विभाग डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे. या दोन दिग्गज व्यक्तींना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी देऊन गौरविण्यात आले.

या समारंभात विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या 30 विद्यार्थ्यांना या वेळी सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात येईल. विविध विद्याशाखेतील 18,720 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली असून यामध्ये 48 विद्यावाचस्पती (पीएच.डी.), 16,752 पदव्युत्तर पदवी, 1,905 पदवी व 15 पदविका या अशा एकूण 9 विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
यावेळी मा. डॉ. सौ. भाग्यश्री पी. पाटील (प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि अध्यक्षा, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे), मा. डॉ. सोमनाथ पी. पाटील (प्र-कुलपती, ज्ञान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, पुणे आणि सचिव, डॉ. डी. वाय. पाटील युनीटेक सोसायटी, पुणे), मा. डॉ. एन. जे. पवार (कुलगुरू डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे), मा. डॉ. सौ. स्मिता जाधव (प्र-कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि सचिव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे) तसेच मा. डॉ. यशराज पी. पाटील (विश्वस्त आणि खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे) यांच्यासह इतर मान्यवर, प्राध्यापक सदस्य, विद्यार्थी आणि पालक यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा

एमआयटी आळंदीचा विद्यार्थी आज आंतरराष्ट्रीय संगीतविश्वात झळकतोय

पदवीदान समारंभ नव्या पर्वाची सुरवात…

मा. श्री. ज्योतिरादित्य एम. सिंधिया म्हणाले – आज पदवीदान समारंभात शैक्षणिक वस्त्र परिधान करून उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांकडे पाहताना मला विकसित भारत २०४७ चे भावी शिल्पकार दिसत आहेत. विकसित भारत २०४७च्या स्वप्नपूर्तीसाठी युवकांनी परिवर्तनाचे नेतृत्व करत सक्रिय योगदान द्यावे. पदवीदान समारंभ हा शेवट नसून, तो आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे येथे मिळालेले शिक्षण, संस्कार आणि अनुभव तुम्हाला आत्मविश्वासाने निर्णय घेण्याची, बदलांना सामोरे जाण्याची आणि राष्ट्रनिर्मितीत अर्थपूर्ण योगदान देण्याची ताकद देतील.

शिक्षकांचे योगदान स्मरणात ठेवा :

आज भारत एका ऐतिहासिक व निर्णायक टप्प्यावर उभा आहे. आरोग्यसेवा, नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि उद्योजकता या क्षेत्रांमध्ये अफाट संधी उपलब्ध आहेत. मी प्रत्येक विद्यार्थ्याला आवाहन करतो की, केवळ नोकरीचा विचार करू नका, तर आपल्या कार्यातून समाजावर आणि देशावर काय सकारात्मक प्रभाव पडेल याचाही विचार करा. धाडसाने जोखीम घ्या, सातत्याने नवे शिकत राहा, आपल्या संस्थेशी कायम जोडलेले राहा आणि आपल्या या यशस्वी प्रवासामागे असलेल्या पालक व शिक्षकांचे योगदान सदैव स्मरणात ठेवा, असे ज्योतिरादित्य एम. सिंधिया म्हणाले.

पदवीप्रदान समारंभ हा संपूर्ण ‘डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ’ परिवारासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. 2003 मधील स्थापनेपासून आजवर, हे विद्यापीठ शैक्षणिक गुणवत्ता, नवनवीन प्रयोग (Innovation), आरोग्य सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कटिबद्ध असलेले एक बहुविद्याशाखीय केंद्र म्हणून नावारूपास आले आहे. भारतीय मूल्यांची जोपासना करत जागतिक दर्जाचे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या ध्येयानेच आमच्या या प्रगतीची वाटचाल झाली आहे.

– डॉ. पी. डी. पाटील, कुलपती.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button