विधायक उपक्रम: गोदान करीत सागर थोरात यांचा गोसंवर्धनाचा संदेश!
![Constructive activities: Godan Karait Sagar Thorat's message for cow conservation!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/sagar-Thorat-pcmc-780x470.jpeg)
घुले महाराजांकडून कौतूक : संत तुकाराम महाराज गोशाळेला गिर गाय भेट
पिंपरी : वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या मोजकेच सामाजिक कार्यकर्ते आढळतात. मात्र, सागर थोरात यांनी सामाजिक उपक्रमांसह गोशाळेला गोदान करीत आदर्श निर्माण केला आहे. थोरात यांनी आपल्या कृतीतून गो-संवर्धनाचा संदेश दिला आहे, असे गौरोवोद्गार घुले महाराज यांनी काढले.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार यांचे कट्टर समर्थक आणि चांगभलं प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर थोरात यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त संत तुकाराम महाराज गोशाळेला गिर गाय भेट गोशाळेला गिर गाय भेट दिली. यावेळी गोशाळेचे प्रमुख घुले महाराज, आमदार लांडगे यांच्या सौभाग्यवती पूजा लांडगे, कामगार नेते सचिन लांडगे यांच्या सौभाग्यवती प्रिया लांडगे, देहू नगरपंचायतीचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. किशोर यादव, अक्षय नेवाळे, तानाजी गोंदवले, संकेत नेवाळे यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित हेते.
शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे म्हणाल्या की, सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले पाहिजे. त्याचा अनेक गरजू लोकांना फायदा होतो. सागर थोरात याचे कार्य निश्चितच नव्या पिढीसाठी आदर्शवत आहे.
घुले महाराज म्हणाले की, समाजामध्ये लोकोपयोगी उपक्रमांनी वाढदिवसा साजरे करणारे किंवा गोदान करणारे खूप कमी लोक आहेत. सागर थोरात यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. साधार गोशाळेच्या माध्यमातून वारकरी सांप्रदयाचे शिक्षण घेणाऱ्या मुलांचे संगोपन केले जाते. समाजसेवेत मदत करणाऱ्या थोरात यांचे विधायक उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत.
आमदार महेश लांडगे यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सामाजिक क्षेत्रात काम करीत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमधील नैसर्गिक आपत्तीच्या काळात लांडगे यांनी महाराष्ट्रातून सर्वाधिक मदत उभा केली होती. त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळाली. त्यामुळे वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा संकल्प माझ्या सहकाऱ्यांनी केला. यापुढील काळातही अशाचप्रकारे काम करण्याचा मनोदय आहे.
– सागर थोरात, अध्यक्ष, चांगभलं प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/sagar-Thorat-pcmc-1.jpeg)