पिंपरी / चिंचवड

‘इंद्रायणीनगरच्या विकासासाठी कटिबद्ध’; तुषार सहाणे

प्रभाग क्र. ८ ‘ड’ मधील विकास प्रश्नांवर तुषार सहाणे यांचा ठाम निर्धार

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्र. ८ ‘ड’ मध्ये कचरा व्यवस्थापन, ड्रेनेजची अपुरी व्यवस्था आणि खराब रस्त्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर विकासाचा ठोस आराखडा मांडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तुषार भिवाजी सहाणे यांनी इंद्रायणीनगरच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे

“प्रभागातील समस्या अनेक असल्या तरी त्यावर नियोजित, पारदर्शक आणि लोकाभिमुख विकास,” करणार असल्याचे सहाणे यांनी स्पष्ट केले आहे. कचरा उचलण्याची नियमित व्यवस्था, ड्रेनेज लाईनची तातडीने दुरुस्ती आणि रस्त्यांची दर्जेदार कामे प्राधान्याने केली जातील, असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा –  देशात ‘भारत टॅक्सी’ सेवा कार्यान्वित, पहा सविस्तर दर

ते पुढे म्हणाले, “हा प्रभाग स्वच्छ, सुरक्षित आणि सोयीस्कर बनवणे हेच माझे ध्येय आहे. नागरिकांच्या सहभागातून आणि प्रशासनाशी समन्वय साधून विकासकामे वेगाने पूर्ण केली जातील. केवळ आश्वासने नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्याचा माझा निर्धार आहे.”

जनतेच्या हितासाठी आणि सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने प्रेरित होऊन तुषार सहाणे यांनी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. प्रभाग क्र. ८ ‘ड’ ला कचरा, ड्रेनेज आणि खराब रस्त्यांच्या विळख्यातून मुक्त करून विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी आपण सज्ज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button