न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ख्रिसमस पार्टी उत्साहात
![Christmas party at New City Pride English Medium School in full swing](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/new-city-pride-pimpri-1-780x470.jpg)
विध्यार्थ्यांना दिली नाताळची माहिती : केक कापून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप
पिंपरी : येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ख्रिसमस पार्टी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, प्रमुख पाहुणे शिक्षण मंडळाचे समन्वयक अमृत मसुरे ,चार्टर्ड अकाउटंट रूपाली घोलप प्रसिद्ध लेखक धनंजय भिसे शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत , तात्या शिनगारे, रामभाऊ खंडागळे व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी नाताळ सणाबद्दल माहिती सांगितली. येशूच्या गीतांवर विद्यार्थ्यांनी गीत गायन, नृत्य सादर केले.रांगोळी, मेहंदी, काव्य वाचन, वक्तृत्व पाककला अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मुलांसाठी पण फनफेअर, फूड फेस्टिवलचे व फनी गेम्स चे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा शिरोडकर यांनी केले आणि शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी विद्यार्थ्यांना येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी माहिती तसेच नाताळाचे महत्व समजावून सांगितले. मेरी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा ही दिल्या. शेवटी सांताक्लॉजच्या हस्ते केक कापून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी पार्टीचा आनंद घेतला. आभार सरला शिंदे यांनी केले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/new-city-pride-pimpri-1024x768.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/new-city-pride-pimpri-2-1024x475.jpg)