जागतिक स्पर्धेत नवनवीन कौशल्य गरजेची; चोयोन निओगी
शिक्षण विश्व: 'एमआयटी'मध्ये “परदेशात नोकरीच्या संधी” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
जागतिक स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी सतत नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. असे मत जर्मन स्त्रीत मर्सिडीज बेंज कंपनीचे अभियंता चोयोन निओगी यांनी व्यक्त केले.
एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये अफलाटस क्लब (विद्यार्थी व्यवहार विभाग) यांच्या वतीने “परदेशी देशांमध्ये नोकरीच्या संधी” या विषयावर एक माहितीपूर्ण व मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते. जर्मनीतील मर्सिडीज-बेंझ कंपनीतील अभियंता चोयोन निओगी यावेळेस उपस्थित होते. निओगी हे एमआयटी एसीएससीचे माजी विद्यार्थी असून, त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील अनुभव विद्यार्थ्यांशी दिलखुलासपणे शेअर केले.
हेही वाचा : मुंबईसह राज्यभरात आजही मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
या सत्रात त्यांनी परदेशात उच्च शिक्षण घेऊन नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक तयारी, भाषा कौशल्य, तांत्रिक आणि सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व, तसेच करिअरमध्ये सातत्यपूर्ण प्रगती साधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींवर सखोल मार्गदर्शन केले. जागतिक स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी सतत नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
परदेशात नोकरी करताना मिळणाऱ्या संधी, जसे की उच्च वेतन, आंतरराष्ट्रीय अनुभव, व्यावसायिक वाढ, सांस्कृतिक समृद्धी आणि वैयक्तिक विकास या बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. व्याख्यानाच्या समारोपात नेटवर्किंगच्या महत्त्वावर भर देताना त्यांनी सांगितले की, “तुमचे नेटवर्क हीच तुमची निव्वळ संपत्ती आहे; जागतिक संधी शोधण्यासाठी प्रभावी कनेक्शन तयार करा.”
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संचालक डॉ. बी बी वाफारे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. कार्यक्रमाच्या संयोजनात अफलाटस क्लबच्या समन्वयक कविता शिंदे यांचा विशेष सहभाग होता. तसेच असोसिएट डीन डॉ. सुनील महाजन, प्रा. अनुपमा अलगण्नवार, प्रा. ऋषिकेश चिकणे, प्रा. सचिन झेंडे आणि प्रा. शितल शेवकरी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंशू बेबी आणि वैष्णवी लोणकर यांनी केले. त्यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली. विद्यार्थ्यांनी या व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि परदेशी करिअरबाबत नव्या दृष्टीकोनाने विचार करण्यास सुरुवात केली.




