Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड मतदारांची फेक कॉलवरून दिशाभूल; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार!

मिशन विधानसभा : महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे समर्थकांकडून तक्रार

चिंचवड : हॅलो..मी डॉ अमोल कोल्हे बोलतोय!, येत्या निवडणूकीत शंकर जगताप यांना मतदान करा असे आवाहन करणारा फेक फोन कॉल चिंचवडमधील मतदारांना येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे समर्थकांकडून निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यात आली आहे.

फेक कॉल वरून लाखो रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार आपण ऐकला असेल पण, आता महायुतीच्या उमेदवारांकडून थेट मतदारांना स्टार प्रचाराकांच्या नावे फेक कॉल करून दिशाभूल करण्याचे काम सुरु असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक डॉ. अमोल कोल्हे यांचे ट्रू कॉलरवरनाव येत असल्याने मतदार उत्सुकतेने तो कॉल घेत आहेत. मात्र, फोन घेताच महायुतीच्या शंकर जगताप यांना मतदान करण्याची विनंती ते करत आहेत.

याबाबत राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना शंका आली त्यांनी याबाबत खातरजमा केली असता हा सर्व फेक कॉल आणि फसवणूकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यलय गाठून याबाबत तक्रार दिली आहे.

चिंचवडमधील भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांच्याकडून अमोल कोल्हेंच्या नावाचा वापर करून फेक कॉलद्वारे मतदारांची फसवणुक वदिशाभूल होत आहे. अमोल कोल्हेकडून भाजपचा प्रचार केला जात असल्याच भासवलं जात आहे. जनतेची दिशाभूल करनाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी.
– रोहन जाधव, राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल कलाटे यांचे उमेदवार प्रतिनिधी.

 

महाविकास आघाडीसमोर आपला पराभव अटळ असल्याचे जाणून आता भाजपच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे. पराभव कमी फरकाने व्हावा म्हणून आता अशा फसवणूकीची केवीलवाणी कुबडी हाताशी धरली जात आहे. जनता याला भीक घालणार नाही महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे.
– राहुल कलाटे, उमेदवार महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शारदचंद्र पवार पक्ष.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button