breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिवाळी सुट्टीतही विद्यार्थ्यांचा बालदिवस उत्साहात

भोसरीतील गायत्री इंग्लिश स्कूलचा आदर्शवत उपक्रम

विविध ‘ॲक्टिव्हीट’जद्वारे विद्यार्थ्यांची ‘ऑनलाईन’ धम्माल

पिंपरी : बाल दिवस..म्हणजे विद्यार्थ्यांच्या आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस. मात्र, यावर्षी दिवाळीच्या सुट्टयांमुळे अनेक शाळांमध्ये ‘चिल्ड्रेन्स डे’ साजरा झाला नाही. याला अपवाद ठरले ते म्हणजे भोसरीतील गायत्री इंग्लिश मिडियम स्कूल. विद्यार्थी आणि पालकांबाबत आपुलकी निर्माण केलेल्या गायत्री स्कूल प्रशासनाने यावर्षी ‘ऑनलाईन’ बाल दिवस’ साजरा केला.

स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या (एसव्हीएसपीएम) भोसरी येथील ग्रायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रतिवर्षी बाल दिन (दि.१४ नोव्हेंबर) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी दिवाळीच्या सुट्टी सुरू होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्कूलमध्ये धम्माल करता येणार नाही. त्यामुळे स्कूल प्रशासनाने ‘ऑनलाईन बाल दिवस’ साजरा करण्याचा नवा फंडा नियोजित केला. त्याला विद्यार्थ्यांसह पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘दिवाळी मेला’ च्या निमित्ताने स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी पणती बनवल्या होत्या. या उपक्रमातून प्रोत्साहन घेवून त्यांनी स्वत: पणत्या आणल्या आणि सुशोभित करुन आपल्या नातेवाईकांना भेट दिल्या आहेत.

हेही वाचा – महत्वपूर्ण अपडेट! ‘नेट’ प्रमाणे ‘सेट’ही वर्षातून दोनदा होणार

तसेच, विविध ‘ॲक्टिव्हीटी’ सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. त्यामुळे यावर्षीचा बालदिवसही संस्मरणीय झाला. यांसाठी उपमुख्याध्यपिका प्रिया नेवाळे व श्रुती जोशी यांनी यांनी पुढाकार घेतला. पूर्व प्राथमिक विभागाच्या वृशाली आहिरे व त्यांच्या टीमने अतिशय सुंदर मुखवटे करुन मुलांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला.

शाळेतील सर्व विभागाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी याकामी पुढाकार घेतला. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष विनायक भोंगाळे, व्यवस्थापकीय संचालक कविता भोंगाळे, विश्वस्त सरिता विखे-पाटील यांनी या उपक्रमाचे कौतूक केले.

‘‘बाल दिवस’’ हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील संस्मरणीय दिवस असतो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त देशात बाल दिवस साजरा होतो. त्यांचे लहान मुलांचा जिव्हाळा असल्यामुळे त्यांना प्रेमाचे ‘चाचा नेहरु’ असे संबोधले जात असे. हा बाल दिवसाबाबतचा इतिहास आता नव्या पिढीला कळला पाहिजे. तसेच, मुलांचे शिक्षण आणि अधिकार याबाबत जागृती व्हायला पाहिजे. कारण, मुले हे देशाचे भविष्य आहेत.

विनायक भोंगाळे, संस्थापक अध्यक्ष, एसव्हीएसपीएम, भोसरी.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button