ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखली-तळवडे- रुपीनगरमधील वीज समस्या सोडवण्यासाठी पुढाकार!

आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांची बैठक

पिंपरी : गेल्या आठवडाभरात झालेल्या अतिमुसळधार पाऊसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली, तळवडे-रुपीनगर रहिवाशी आणि औद्योगिक पट्टयातील वीज समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवली आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि नोकरदार यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. त्यामुळे वीज समस्या सोडवण्यासाठी महावितरण प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे.

सर्वसामान्य नागरिकांकडून वीज समस्यांबाबत तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार महावितरणचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. महानगरपालिका प्रभाग क्रमांक- १ मधील चिखली गावठाण भाग, पाटीलनगर, गणेशनगर, मोरे वस्ती, म्हात्रे वस्ती,ताम्हाणे वस्ती,, शेलार वस्ती, सोनवणे वस्ती आदी भागातील वीज समस्या सोडवण्यासाठी महावितरण प्रशासनाचे अधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.

यावेळी माजी नगरसेवक सुरेशतात्या म्हेत्रे, माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, जितेंद्र यादव, माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव, सामाजिक कार्यकर्ते विनायक मोरे, योगेश सोनवणे, अंकुश मळेकर, ऋषी मोरे, अविनाश मोरे, कामगार नेते किसन बावकर, रविंद्र राजगुरू, संतोष सुळके आदी उपस्थित होते. तसेच, महावितरणचे कार्यकारी अभियंता अतूल देवकर, उपकार्यकारी अभियंता अशोक जाधव, कनिष्ठ अभियंता शाम दिवटे यांनी वीज विषयक समस्या जाणून घेतल्या. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.

प्रलंबित कामे मार्गी लावणार…
दरम्यान, तळवडे-रुपीनगर येथील समस्यांबाबतही बैठक घेण्यात आली. यामध्ये वीज समस्या निर्माण झालेल्या परिसरामध्ये वीज वाहिनी भूमिगत करणे आणि जुन्या ओव्हरहेड वीजवाहिन्या काढून टाकणे, जुने फिडर पिलर आवश्यक आहे तिथे बदलणे, वीज वाहिन्यांचे सर्व्हेक्षण करुन ना-दुरूस्त झालेल्या वाहिन्या बदलणे, नवीन ट्रान्स्फार्मर बसवणे, आरडीएसएस व डीपीडीसी मार्फत निधीची उपलब्धता करुन वीज विषयक प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक शांताराम भालेकर, पांडुरंग भालेकर, अनिल भालेकर, संदीप जाधव, रामदास कुटे, वैभव खोडवे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया :
अतिमुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीज समस्या निर्माण झाल्या आहेत. वीज समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी ‘परिवर्तन हेल्पलाईन- 93 79 90 90 90’ वर संपर्क करावा. मी आणि माझे सहकारी वीज समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. गेल्या आठवडाभरामध्ये सर्वसामान्य नागरिक, गृहणी, उद्योजक आणि व्यावसायिकांना वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे नाहक मन:स्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळे तातडीने दुरूस्तीचे कामे व उपाययोजना करण्याच्या सूचना महावितरण प्रशासनाला केल्या आहेत.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button