बाल दिनानिमित्त इंडो ॲथलेटिक्स सोसायटीतर्फे चौराई देवी ‘बाईक अँड हाईक’
![Chaurai Devi 'Bike and Hike' by Indo Athletics Society on the occasion of Children's Day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/ईडो-एथलेटिक्स.jpg)
पिंपरी चिंचवड | इंडो ॲथलेटिक्स सोसायटीतर्फे रावेत ते चौराईदेवी अशी 10 किलोमीटर सायकलिंग 4 किलोमीटर हायकिंग बालदिन दिवशी (दि.14) यशस्वीपणे पार पडली. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील पालक विद्यार्थी यांच्या सह 300 हून अधिक जण यामध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेचे हे यंदा दुसरे वर्ष होते.यावेळी गणेश कस्पटे, पोलीस अधिकारी अजय दरेकर, आयएएसचे गणेश भुजबळ, अजित पाटील यांनी झेंडा दाखवून फेरिस प्रारंभ केला. रावेत – देहू रोड – सोमाटणे फाटा – चौराईदेवी मंदिर असा या उपक्रमाचा मार्ग होता.
पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ परिसरातील विविध ठिकाणाहून सायकलस्वार सहभागी झाले होते. गेली दोन वर्षे मोफत उपक्रम राबविण्यात येत आहे. बाल दिनानिमित्त महिला व लहान मुलांचा यामध्ये विशेष सहभाग दिसून आला. गणेश भाऊ कस्पटे युवा मंच यांच्यातर्फे सर्वांना अल्पोपहार आयोजन करण्यात आले.
नियोजनात इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे रोहित जयसिंघानी, संदीप परदेशी, सुनील चव्हाण, अभिनंदन कासार, तन्मय माने, रवी पाटील , रामदास केदारी, सुधीर कस्पटे, प्रमोद चिंचवडे , गिरीराज उमरीकर, अजित गोरे यांनी सहकार्य केले.