मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/images-2-7.jpeg)
पिंपरी l प्रतिनिधी
महिलेला, तिच्या मुलाला आणि जावयाला मारहाण केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घराच्या बांधकामाच्या कारणावरून हा वाद झाला असून चुलत दीर आणि चुलत सास-याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 10) दुपारी साडेतीन वाजता दापोडी येथे घडला.
सुजाता सोमनाथ गायकवाड (वय 42, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्तात्रय माणिकराव गायकवाड, ऋषभ दत्तात्रय गायकवाड (दोघे रा. दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात घराच्या बांधकामावरून वाद होता. त्यातून चिडून आरोपींनी फिर्यादी, त्यांचा मुलगा ऋषिकेश आणि जावई मयूर राजाराम जाधव यांना मारहाण केली. ऋषभ याने फिर्यादी यांच्या हाताला चावा घेऊन जखमी केले. तर चुलत सासरे दत्तात्रय यांनी लाकडी दांडक्याने डोक्यात मारून फिर्यादी यांना जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.