Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशीत नागेश्वर महाराजांच्या मानाच्या विड्याला तब्‍बल ९१ लाखांची बोली

  • अर्पण केलेल्‍या वस्‍तूंचा लिलाव १ कोटींच्या घरात

पिंपरी |महाईन्यूज|

तब्बल ९१ लाख एक वार एक… असा आवाज मोशीच्या श्री नागेश्‍वर महाराज देवस्थान सभागृहामध्ये घूमत होता. श्री नागेश्वर महाराजांच्या भंडारा उत्सवातील अर्पण केलेल्या वस्तूंच्या लिलाव पार पडला. मोशी गावच्या इतिहासात शनिवारी (दि.१३) प्रथमच महाराजांच्या मानाच्या विड्याला एवढी मोठी बोली लावण्यात आली. यावेळी बोली लावण्याचा मान सालाबादप्रमाणे केदारी कुटुंबाला देण्यात आला होता.

मानाच्या विड्याच्या लिलावासाठी लाखोंची बोली लावण्यासाठी श्री नागेश्‍वर महाराज भंडारा उत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. या उत्सवात यंदाच्या लिलावामध्ये मानाच्या विड्याला तब्बल ९१ लाखांची बोली लावली गेली. हा विडा मोशीतील उद्योजक गणेश कुदळे यांनी घेतला. या विड्यातून महाराजांचा आशीर्वाद मिळाल्याची भावना कुदळे यांनी व्यक्त केली. तसेच, मानाची ओटी वासुदेव आल्हाट व धोंडीबा आल्हाट यांनी १६ लाख ५० हजार रुपये बोली लावून घेतली. मोशीच्या आजपर्यंतच्या इतिहासात मानाच्या विड्यासाठी एवढी मोठी बोली लावल्याने हा इतिहास घडला, असे ग्रामस्थांनी सांगितले.

कोरोनाच्या नियमांचे पालन करत दीडशे वर्षांची परंपरा जतन करून येथील भंडारा उत्सव सुरू आहे. शनिवारी (दि. १३) लिलाव होता. स्थानिक ग्रामस्थ महाराजांना सोन्या-चांदीचे दागिने, शेतातील फळे, भाजीपाला यासह विविध वस्तू अर्पण करतात. महाराजांचा मानाचा विडा, ओटी व मानाचे लिंबू आदी वस्तूंचा लिलावास शनिवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. पिढ्यान् पिढ्या लिलावाची बोली लावण्याचे काम नारायण केदारी, सागर केदारी आणि निखिल केदारी यांनी केले. आपल्या खर्जातील आवाजात एक-एक वस्तूंची ते बोली लावत होते. शासकीय नियमानुसार, मोजक्या विश्‍वस्त व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा लिलाव सुरू होता. यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, नितीन सस्ते, हरिभाऊ सस्ते, स्वीकृत नगरसदस्य सागर हिंगणे, प्रभाकर बोराटे, नीलेश बोराटे, अतिश बारणे उपस्थित होते. ‘विड्याच्या रूपाने महाराजांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे’, असे गणेश कुदळे, वासुदेव आल्हाट व धोंडीबा आल्हाट यांनी सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button