breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दहीहंडी निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल

पिपरी :  पिपरी-चिंचवड शहरात विविध मंडळांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या दहीहंडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी लोकांची प्रचंड प्रमाणात रस्त्यावर गर्दी होत असते. या गर्दीमुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत रहावी याकरिता वाहतूक विभागाच्या वतीने शहरात काही ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

चिखलीवरुन साने चौक मार्गे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून या मार्गावरील वाहने अष्टविनायक चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच, कृष्णानगर भाजी मंडई चौकाकडून साने चौक मार्गे जाणारी सर्व प्रकारची वाहने कृष्णानगर चौकातील सेवा रस्त्याने त्रिवेणीनगर चौक मार्गे चिखलीकडे जातील.

चऱ्होली फाटा ते दाभाडे सरकार चौक मार्गे मरकळ शिक्रापूर कडे जाणाऱ्या – येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून या मार्गाने येणारी जाणारी वाहने मॅजिक मिठाई स्विट होमजवळ डावीकडे वळून पुलावरुन पीसीएस चौक (धानोरे फाटा) मार्गे इच्छित स्थळी जातील.

हेही वाचा    –    ‘निर्लज्ज राजकारण’, महाराष्ट्र सरकारवर अभिनेता शशांक केतकर भडकला; म्हणाला..

लिंब फाटा चौकाकडून तळेगाव स्टेशन चौकाकडे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीस मारुती मंदिर चौक मार्गे जाण्यास मनाई आहे. ही वाहतूक राज मेडीकल कार्नर – जिजामाता चौक – खांडगे पेट्रोल पंप – तळेगाव स्टेशन चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

पुणे – नाशिक महामार्गावरील बाबर पेट्रोल पंप चौकाकडून जायका चहा या दुकानाजवळून भोसरी ओव्हर ब्रिजचे खाली जाणाऱ्या दुचाकी वगळून इतर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. ही वाहने भोसरी ओव्हर ब्रिज मार्गे पुढे सद्‌गुरुनगर चौकातून यु टर्न मारुन भोसरी ब्रिज खालून दिघी-आळंदी मार्गे इच्छितस्थळी जातील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक बंटी ग्रुप, मेन रोड आकुर्डी या ठीकाणी येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून ही वाहतूक खंडोबा माळ चौकातून म्हाळसाकांत चौकाकडे इच्छित स्थळी जाईल.

लालबहादुर शास्त्री चौक (काचघर चौक) प्राधीकरण निगडी येथे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद असून ही वाहतूक भक्तीशक्ती ब्रिजवरुन काचघर चौकात न येऊ देता ती सरळ अप्पूघरमार्गे इच्छीत स्थळी जातील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button