breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

Pune : दहिहंडीनिमित्त पुण्यातील PMPML बस मार्गात बदल

पिंपरी : पुणे शहरात गणेशोत्सवासह दहीहंडी उत्सवही मोठ्या जल्लोषात पार पडतो. येत्या ७ सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दहीहंडीनिमित्त पुण्यातील मध्यवर्ती भागातील PMPML बससेवा वळवण्यात आली आहे. एका दिवसासाठी बस मर्गात बदल करण्यात आला आहे. तर काही मार्गांवरच्या बसेस बंद ठेण्यात आल्या आहेत.

कसे असणार बस मार्गात बदल?

  • बसमार्ग क्र. 50: शनिवारवाडा ते सिंहगड या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर स्वारगेट बस स्थानकावरून संचलनात राहतील.
  • बस मार्ग क्र. 113: अ.ब. चौक ते सांगवी या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर म.न.पा. भवन स्थानकावरून संचलनात राहतील.
  • बस मार्ग क्र. 8, 9, 57, 94, 108, 143, 144, 144 अ या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता डेक्कन जिमखाना, म.न.पा. भवन, गाडीतळ (जुना बाजार) या मार्गाने संचलनात राहतील.

हेही वाचा – ‘अजित पवारांना अडचणीत आणत, सरकारमधून काढण्याचा कट’; भाजप नेत्याचा मोठा दावा

  • मार्ग क्र. 174: 6 आणि 7 सप्टेंबर रोजी रस्ता बंद झाल्यानंतर गाडीतळ (जुना बाजार) म.न.पा., डेक्कन मार्गे संचलनात राहील.
  • स मार्ग क्र. 2 , 2 अ, 10, 11, 11अ, 11 क, 13, 13 अ, 28, 30 , 20, 21, 37, 38, 88, 216, 297, 298, 354, रातराणी-1, मेट्रो शटल-12: या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर शिवाजीनगरकडुन स्वारगेटकडे येताना जंगली महाराज रोड, डेक्कन, टिळक रोड मार्गे संचलनात राहतील. मात्र स्वारगेटकडुन शिवाजीनगरला जाताना वरील मार्गावरील बसेस मार्गाने बाजीराव रोडने संचलनात राहतील.
  • बस मार्ग क्र. 7, 197, 202: या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड या मार्गाने संचलनात राहतील.
  • बस मार्ग क्र. 68: या मार्गाचे बसेस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड या मार्गाने संचलनात राहतील.
  • स्वारगेट आगाराकडुन बस मार्ग क्र. 3 आणि 6 : हे दोन बस मार्ग दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येईल.

मार्गांमध्ये बदल केल्यामुळे अनेक नागरिकांना प्रवासासाठी त्रास होऊ शकतो किंवा त्यांना पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी लागू शकते. त्यांना होणाऱ्या त्रासासाठी PMPML प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच, पीएमपीने केलेल्या बदलाला नागरिकांनी सहकार्य करावं, असंही आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button