ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जाती- धर्माच्या भिंती मोठया प्रमाणात उभ्या आहेत

खासदार अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन, सावता भूषण पुरस्कार व विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराजांनी विधायक कार्यासाठी अठरापगड जातीच्या मावळयांना एकत्र कारण्याचा एक आदर्श घालून दिला. मात्र आज राज्यातील सामाजिक परिस्थिती पाहता जाती- धर्माच्या भिंती मोठया प्रमाणात उभ्या आहे. जाती-धर्माला मी दगड समजतो. या दगडाची भिंती बांधल्या तरी समाज तुटेल, मात्र याच जातीच्या दगडाचा पूल बांधल्यास समाज एकमेकांशी जोडला जाईल. देशाच्या भविष्यासाठी असे पूल बांधण्याचे कार्य प्रत्येकाला करावे लागणार आहे. असे उदगार खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी काढले.
महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या वतीने चिंचवड येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सावता भूषण पुरस्कार व विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार योगेश टिळेकर, नाट्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल भाऊसाहेब भोईर यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संत सावता भूषण पुरस्कार अमृत शेवकरी(चाकण) यांना तर संत सावता कृषीरत्न पुरस्कार, चंद्रकांत दर्शले(पुनावळे) व तुकाराम महाराज ताजणे ( चऱ्होली) यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप,माजी महापौर अपर्णा डोके ,वरिष्ठ पो. निरीक्षक शत्रुघ्न माळी,वंसत लोंढे, संतोष लोंढे,सुरेश म्हेत्रे,अनुराधा गोरखे,शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. राजेश बनकर, सीए सुहास गार्डी, अनिता फरांदे, चेतन भुजबळ, अश्विनी चिंचवडे, मोहन भूमकर, माधवी राजापुरे, संगीता ताम्हाणे, रेखा दर्शले, गणेश दळवी, राजू करपे,राजाभाऊ भुजबळ, भारत आल्हाट, उद्योजक संजय जगताप, कविता खराडे,प्रशांत डोके,अध्यक्ष हणमंत माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

खा. डॉ कोल्हे पुढे म्हणाले कि, आपल्या जातीचा अभिमान असणे दुर्दैवाने याचा अर्थ आज इतर जातींचा द्वेष करणे अशी सामाजिक परिस्थिती दिसून येत आहे. आपण कोणत्या जाती धर्मात जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नसते. कर्तृत्व असे गाजवा कि आपल्या कर्तृत्वचा आपल्या समाजाला गर्व वाटेल. सामाजिक, शैक्षणिक,राजकीय क्षेत्रात आपले जितके योगदान आहे तितका वाटा आपल्याला मिळतो का हा प्रश्न विचारला पाहिजेत.योगदानाच्या प्रमाणात वाटा हवा असेल तर आपल्या कर्तृत्वाची रेषा लांब करा.आज शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.शेतकऱ्यांचा आसूड सामाजिक अवस्थेवर ओढताना शेतकरी कोणत्या जाती धर्माचा आहे यापेक्षा तो शेतकरी या जातीचा आहे. म्हणून आसूड ओढावा अशी अशी स्थिती निर्माण झाली आहे.

खासदार बारणे म्हणाले कि, आई वडील कबाडकष्ट करून आपल्या मुलांना शिकवतात या कष्टाची जाण ठेवून मुलांनी शिक्षण घ्यावे. आणि आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करावे. सावता महाराजांच्या कर्मयोगाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. असा सल्ला दिला. डॉ.बनकर म्हणाले कि, फक्त गुण महत्वाचे नाही, तर कौशल्य आत्मसात करून यश संपादन करावे. आभासी दुनियेत न रमता कष्ट करा. कष्टाला पर्याय नाही. यशला शॉर्टकट नाही. संकटाला संधीत रूपांतर करा. असा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष हणमंत माळी यांनी केले.सूत्रसंचालन महादेव भुजबळ,पौर्णिमा कोल्हे, ऋतुजा चव्हाण यांनी केले.सूर्यकांत ताम्हाणे यांनी अहवाल वाचन केले तरी विश्वास राऊत यांनी आभार मानले. समिता गोरे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या मधुमेह तपासणी शिबिराचा 315 जणांनी लाभ घेतला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल साळुंके, प्रदीप दर्शले, नवनाथ कुदळे, नितीन ताजणे, विजय दर्शले, किशोर माळी, श्रीहरी हरळे, प्रकाश गोरे, वेजनाथ माळी, अजित भोसले, नरहरी शेवते,विलास शेंडे आदिंनी परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button