Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

जल्लोष २०२५ युवक महोत्सवासाठी नावनोंदणीचे आवाहन

शिक्षण विश्व: पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजतर्फे आयोजन

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ आणि डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पिंपरी पुणे – १८ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जल्लोष २०२५-२६’ या जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सुरु होणार आहे. पिंपरी चिंचवड शहर तसेच मावळ, खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील पुणे विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे.

हेही वाचा       :            देशात देशभक्तीचा व्यापार चाललाय; उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका

या युवक महोत्सवामध्ये एकूण २७ कलाप्रकारांचा समावेश असून स्पर्धा प्रमुख पाच गटांमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. संगीत विभागात शास्त्रीय भारतीय गायन, टाळ वाद्य, स्वर वाद्य, सुगम संगीत (भारतीय व पाश्चात्य), समूहगान, लोकसंगीत वाद्यवृंद यांचा समावेश आहे. नृत्य प्रकारात लोक व आदिवासी नृत्य तसेच शास्त्रीय भारतीय नृत्य घेतले जाणार आहे. रंगमंचीय कला विभागात एकांकिका, प्रहसन, मूकनाट्य, नकला तर ललित कला गटात स्थळचित्र, चित्रकला, भित्तिचित्र, मातीकला, मेहंदी, रांगोळी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. वाङ्मय प्रकारात प्रश्नमंजुषा, वक्तृत्व आणि वादविवाद यांचा समावेश आहे.

विशेष बाब म्हणजे, इच्छुक विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या दिवशीही “स्पॉट एन्ट्री” द्वारे सहभाग नोंदविता येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक (अतिरिक्त कार्यभार) श्री. अभिजित कुलकर्णी, डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजित पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. नीता मोहिते आणि सांस्कृतिक समन्वयक डॉ. शैलेन्द्र कांबळे यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button