पिंपरी / चिंचवडपुणे
मोशी येथील गंधर्व नगरी सोसायटीत साडेचार लाखांची घरफोडी
![Burglary of Rs 4.5 lakh in Gandharva Nagari Society in Moshi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/chori01-3.jpg)
पिंपरी चिंचवड | मोशी येथील गंधर्व नगरी सोसायटीत साडेचार लाखांची घरफोडी झाल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांनी दरवाजा तोडून घरातील सोन्याचे दागिने यासह 4 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. 24 ते 27 जुलै 2021 दरम्यान हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी नारायण उत्तम जाधव (वय 33, रा. गंधर्व नगरी, मोशी) यांनी शुक्रवारी (दि.30) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचे सेफ्टी डोअर व आतील लाकडी दरवाजाचे लॉक तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने असा 4 लाख 55 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.