ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बिजलीनगर मध्ये सव्वा लाखाची घरफोडी

पिंपरी चिंचवड | बिजलीनगर मध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून एक लाख वीस हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना 17 जुलै रोजी रात्री उघडकीस आली. याबाबत 24 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जीवन तुकाराम ढवाण (वय 36, रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराचा गॅलरी कडील बेडरूमचा दरवाजा कडीकोयंडा तोडून उघडला. बेडरूममधील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातून एक लाख 20 हजार 455 रुपये किमतीचे 32.70 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button