‘देशातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारा अर्थसंकल्प’; अमित गोरखे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-36-2-780x470.jpg)
पिंपरी : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (दि.23 जुलै) रोजी देशाची प्रगती करणारा अर्थसंकल्प आहे. देशातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया आमदार अमित गोरखे )यांनी दिली.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांचा सातवा अर्थसंकल्प सादर केला आहे. लोकसभेतील विजयानंतर 3.0मोदी सरकारचा हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प असून यामध्ये त्यांनी पीएम आवास योजनेसाठी 10 लाख कोटींचे वाटप करण्यासह गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी राजावर केंद्रित असून अर्थसंकल्पात रोजगार आणि कौशल्यावर भर दिला आहे.अर्थसंकल्पात तरुणांसाठी 2 लाख कोटींची तरतूद करण्यातआलेली आहे.
हेही वाचा – Union Budget 2024 | इन्कम टॅक्सबाबत बजेटमध्ये मोठी घोषणा, नवी करप्रणाली कशी असेल?
नैसर्गिक शेती करण्याला सरकारकडून प्राधान्य दिले गेले आहे. डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. सरकारकडून शेती, तसेच शेतीपुरक क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे,नक्कीच यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी राजाला याचा फायदा होईल, असे गोरखे म्हणाले.