पिंपरी / चिंचवड

वेश्‍याव्यवसाय प्रकरणी दलाल महिलेस अटक

पिंपरी | प्रतिनिधी

एका महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्‍या व्यवसाय करून घेणाऱ्या दलाल महिलेला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 16) सायंकाळी रहाटणी येथे करण्यात आली.

वाकड पोलीस ठाण्यातील 34 वर्षीय कर्मचारी महिलेने याप्रकरणी मंगळवारी (दि.17) फिर्याद दिली आहे. त्यानुसार 24 वर्षीय दलाल महिलेला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप डेअरी, रहाटणी येथील सिल्वरकी ओयो लॉज येथे आरोपी महिला एका पीडित महिलेकडून वेश्‍याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास क्षितिज लेन येथील लॉजवर छापा टाकून पीडित महिलेची सुटका केली. तसेच दलाल महिलेला अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button