बोपखेल फाटा ते गणेशनगर रस्त्याला ‘‘गती’’; माजी उपमहापौर हिरानानी घुले यांच्या मागणीला यश
संरक्षण विभागाकडून रस्ता ताब्यात देण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
![Bopkhel Phata to Ganesh Nagar Road “Gati”; Former Deputy Mayor Hiranani Ghule's demand succeeded](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Chetan-Ghule-780x470.jpg)
पिंपरी : बोपखेल गावातून जाणारा भारतीय संरक्षण विभागाच्या हद्दीतील बोपखेल फाटा ते गणेशनगर रस्ता आता ६० फूट रुंद होणार आहे. त्यामुळे वाहतूक समस्या निकालात निघणार असून, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
बोपखेल गावाच्या हद्दीवरील रोड (बोपखेल फाटा ते गणेश नगर रस्ता) ६० फूटी करावा. या करिता माजी उपमहापौर हिरानानी घुले आणि शिक्षण समितीचे माजी सभापती चेतन घुले यांनी सातत्त्याने प्रशासनाने पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले.
चेतन घुले म्हणाले की, आमच्या बोपखेलमधील नागरिकांसाठी ही महत्वाची व आनंदची बातमी आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. मिलीटरी हद्दितील रोड महापालिका प्रशासनाच्या ताब्यात मिळावा. या करिता प्रयत्न सुरू होते. त्याला यश मिळाले. लवकरच महानगरपालिकेचे अधिकारी व मिलीटरी विभागाचे डायरेक्टर जागेची पाहणी करणार आहेत. आहेत.