ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शरीरसौष्ठवपटू सागर काटे यांचा आयुध खेलरत्न पुरस्काराने सन्मान

पिंपरी,| आयुध निर्माणी बोर्डच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या शरीरासौष्ठव स्पर्धेमध्ये सलग 7 वर्ष सुवर्ण पदक विजेते पदक प्राप्त केल्याबद्दल भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारा आयुध खेलरत्न पुरस्कार यंदा पिंपळे सौदागर युवा शरीरसौष्ठवपटू सागर सुखदेव काटे यांना नुकताच प्रदान करण्यात आला. काटे यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे समस्त पिंपरी चिंचवड करांची देशभरात मान उंचावली आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली तिन्ही सैन्य दलासाठी शस्त्रास्त निर्मिती करणाऱ्या देशभरातील ४१ आयुध निर्मिती कारखान्याच्या संयुक्तपणे आयुध निर्माणी बोर्ड च्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या शरीरासौष्ठव स्पर्धेमध्ये सलग 7 वर्ष सुवर्ण पदक विजेते पदक प्राप्त केल्याबद्दल भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आयुध खेल रत्न पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी सागर काटे यांची निवड झाली होती.पिंपळे सौदागर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात वाढलेल्या सागर काटे यांनी मेहनत व जिद्दीच्या जोरावर अथक परिश्रम करून मिळविलेले हे यश इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. सागर काटे यांनी सलग १५ वर्ष अखंडितपणे समर्पण ठेवीत अतिशय निष्ठेने आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर या पुरस्काराला गवसणी घातली आहे. यापूर्वी शरीरसौष्ठव स्पर्धेत त्यांनी पुणे श्री, महाराष्ट्र श्री व मानाचा भारत श्री पुरस्कार पटकाविला आहे . कुठलीही पारंपरिक पार्श्वभूमी नसताना या खेळामध्ये सातत्यपूर्वक व नेत्रदीपक कामगिरी करत सागर काटे यांनी पंचक्रोशीसह शहराचे नाव देशभरात अधोरेखित केले आहे. प्रतिकूल परिस्थितीतुन पुढे येऊन दृढ निश्चियी मनोवृत्ती आणि अथक परिश्रमच्या जोरावर त्यांना प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांमधून सागर काटे यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button