breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप सदस्यता नोंदणी अभियानाला जोरदार सुरुवात!

पिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात झाली असून आमदार हेमंतजी रासने यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने भाजप कार्यालयात कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.

भारतीय जनता पक्ष हा एक विशाल कुटुंब आहे. अधिक सदस्य नोंदणीमुळे पक्षाची ताकद वाढते आणि आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. नोंदणी ही फक्त संख्यात्मक वाढ नाही, तर पक्षाची तत्त्वे समजून घेण्याची आणि सक्रिय सहभागाची संधी आहे.या सदस्यता नोंदणी अभियानाद्वारे भाजपला आणखी मजबूत बनवण्यासाठी एकत्र काम करू आणि पक्षाची निती व तत्त्वे घराघरांत पोहोचवू! असा संकल्प यावेळी करण्यात आला.

हेही वाचा      –     सोनं स्वस्त की महाग? जाणून घेऊयात वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात मौल्यवान धातूचे दर

यावेळी विधानपरिषद आमदार अमितजी गोरखे, कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, द. भारतीय आघाडीचे संयोजक राजेशजी पिल्ले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेशजी कुलकर्णी, वरिष्ठ उपाध्यक्ष राजूभाऊ दुर्गे, मोरेश्वर शेंडगे, संजय मंगोडीकर (सरचिटणीस व संयोजक सदस्यता अभियान), भाजप जिल्हा सरचिटणीस शीतलदादा शिंदे, नामदेवदादा ढाके (सरचिटणीस) यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button