breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या ‘त्या’ भेटीमुळेच भाजपाचे नगरसेवक रवि लांडगेंची मोठी संधी हुकली!

  • भाजपा पक्षश्रेष्ठींकडील विश्वासार्हतेला तडा
  • स्थायी समिती सभापतीपदासाठी डावलले

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून भोसरी विधानसभा मतदार संघातील नितीन लांडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यांची निवड ही निश्चित असून यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी पक्षाने उमेदवारी टाळल्यामुळे नाराज झालेले भोसरीचे नगरसेवक रवी लांडगे यांनी तडकाफडकी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र रवी लांडगे याचे नाव शेवटपर्यंत चर्चेत असून देखील त्यांना  स्थायी समिती अध्यक्षपद का मिळाले नाही? याबाबत काही राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

भाजपचे नगरसेवक रवी लांडगे हे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी तीव्र इच्छुक होते. तसेच स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शेवटपर्यंत रवी लांडगे यांचे नाव चर्चेत होते. मात्र मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रवी लांडगे यांनी भेट घेतली. ही भेट भाजपला एक प्रकारचा धक्का मानला जात आहे कारण रवी लांडगे हे लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देणार अशा बातम्या सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या. याचा परिणाम रवी लांडगे यांच्या स्थायी समिती अध्यक्षपदावर झाला. कारण की सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये झळकलेल्या बातम्यांमुळे रवी लांडगे कधीही पक्ष सोडू शकतात असा मेसेज भाजपच्या पक्षश्रेष्ठीपर्यंत गेला.

महानगरपालिका २०१७ मध्ये रवी लांडगे याना बिनविरोध निवडून आणण्यासाठी महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. परंतु राजकीय स्पर्धा निर्माण करून लांडगे कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण करण्याची भूमिका काही लोकांनी घेतल्यामुळे रवी लांडगे यांनी मध्यंतरी अजितदादा पवार यांची भेट घेतली त्यामुळे रवी लांडगे यांची पक्ष निष्ठता पणाला लागली.  त्यामुळे रवी लांडगे हे भाजपमधून बाहेर पडतील असे वातावरण निर्माण झाल्याने त्यांचे स्थायी समिती सभापतिपद धोक्यात आलं.

****

शहर भाजपामध्ये झारीतील शुक्राचार्य…

रवी लांडगे आणि आमदार महेश लांडगे यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही भाजप मधील हितशत्रूंनी केला असल्याचे देखील बोलले जात आहे. रवी लांडगे हे पक्षाशी निष्ठावंत आहेत. परंतु भाजपमधील हितशत्रूंनी महेश लांडगे आणि रवी लांडगे यांच्यात मतभेद निर्माण केल्याने या पक्षांतर्गत रस्सीखेचीचा परिणाम आमदार महेश लांडगे यांच्यावर दिसून आला आणि भाजपमधील हितशत्रूंचा फूट पाडण्याचा डाव यशस्वी झाला.

***

शहराध्यक्ष महेश लांडगेंसमोर आव्हान…

नितीन लांडगे हे देखील महेश लांडगे समर्थक असल्यानी रवी लांडगे यांच्या ऐवजी आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली नितीन लांडगे यांना स्थायी समिती अध्यक्षपदासाठी संधी देण्यात आली. त्यामुळे नाराज रवी लांडगेंनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता लांडगे यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान शहरातील पक्षप्रमुख म्हणून भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्यापुढे आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button