Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
कुदळवाडीत श्री छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात
![कुदळवाडीत श्री छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/WhatsApp-Image-2022-05-14-at-12.18.40-PM.jpeg)
भोसरी: आमदार महेश दादा लांडगे युवा मंचाच्या वतीने श्री छत्रपती संभाजी महाराजांची जयंती कुदळवाडीत दिनेश यादव यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
श्री रामकृष्ण लांडगे महाराज यांच्या हस्ते श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी महेश दादा लांडगे युवामंचाचे अध्यक्ष दिनेश यादव,रामलाल देवासी हरिप्रसाद मोर्य,दिपक घन,मोईद शेख.आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री सुरेश वाळूंज यांनी श्री छत्रपती संभाजी महाराजाच्या कार्याविषयीची तरुणांना माहिती दिली. तसेच सध्याच्या तरुण पिढीने श्री छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घेण्याचे आवाहन त्यांनी केले.