मोठी बातमी : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीची युती : सचिन अहिर
![Big news: Shiv Sena-NCP alliance in Pune, Pimpri-Chinchwad: Sachin Ahir](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/sachinahir-pcmc.jpg)
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला फिस्क असून दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी-शिवसेना युती होणार असल्याचे विधान शिवसेनेचे पुण्याचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी केले आहे. पण, जागावाटपासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसून या दोन्ही संदर्भातला अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याकडून घेतला जाईल असेही अहिर यांनी सांगितले.
सचिन अहिर म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी निश्चित होणार आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर युती करण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या वाढत्या ताकदीला राष्ट्रवादी काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्राथमिक चर्चा सकारात्मक झाली आहे. मात्र यासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील आणि त्यांच्याकडूनच तो घोषित करण्यात येईल, असेही असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शिवसेना- राष्ट्रवादीच्या युतीमुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणे बदलणार आहे. सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्यासाठी सेना-राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढल्यास चुरशीचा सामना होणार आहे.